वाशीम : प्रेमी युगुलाचे प्रेमसंबंध, 4 दिवस बेपत्ता, अन् भयंकर घटना उघडकीस
washim crime news : वाशिमच्या मोर्णा तलावात प्रेमी युगुलाचा मृतदेह आढळून आलाय. दोघेही 14 ऑगस्टपासून बेपत्ता होते. कुटुंबियांचा प्रेम संबंधांना विरोध होता, अशी चर्चा आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वाशीम : प्रेमी युगुलाचे प्रेमसंबंध
4 दिवस बेपत्ता, अन् भयंकर घटना उघडकीस
washim crime news, जका खान : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मोर्णा तलावात युवक आणि युवतीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोघेही 14 ऑगस्टपासून बेपत्ता होते. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास मासेमारीसाठी गेलेल्या काही नागरिकांना तलावात दोन मृतदेह तरंगताना दिसले. यानंतर मालेगाव पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
हेही वाचा : मुंबई : पत्नी आणि मुलांच्या मृतदेहासोबत घालवले 24 तास! नेव्ही ऑफिसरने आत्महत्येआधी काय केलं?
माहिती मिळताच मालेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तलावातून दोन्ही मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले. मृतांची ओळख 26 वर्षीय महादेव निंबाळकर आणि 16 वर्षीय निकिता कांबळे अशी झाली आहे. दोघेही मालेगाव तालुक्यातील गोकसांगवी गावातील रहिवासी होते.
हेही वाचा : मनोज जरांगेंचा तगडा डाव, समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईत एल्गार? तारीख ठरली
