बंद फ्लॅटमध्ये बँक कर्मचारी अन् दत्तक मुलाचा मृतदेह, पोलिसांनी दरवाजा उघडताच काय दिसलं?
एका 72 वर्षीय वृद्धाचा आणि त्यांच्या 22 वर्षीय मुलाचा बंद फ्लॅटमध्ये मृतदेह आढळून आला. पश्चिम बंगालमधील या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बंद फ्लॅटमध्ये रहस्यमयी मृत्यू
वडील अन् मुलासोबत काय घडलं?
Crime News : एका बंद फ्लॅटमध्ये 72 वर्षीय वृद्ध आणि त्यांच्या 22 वर्षीय दत्तक मुलाचा मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तपन कुमार चट्टोपाध्याय आणि त्यांचा दत्तक मुलगा एम. डी. हुसेन उर्फ सूर्य अशी मृतांची नावे आहेत. तपन चट्टोपाध्याय हे एका खाजगी बँकेचे माजी कर्मचारी होते आणि ते या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहत होते.
खोलीत वेगवेगळ्या भागात मृतदेह
शुक्रवारी (13 नोव्हेंबर) दुपारी स्थानिक रहिवासी आणि नातेवाईकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, त्यावेळी दोघांचेही मृतदेह खोलीच्या वेगवेगळ्या भागात पडलेले आढळून आले. कोलकाता येथील दमदम भागातील सेठबागान परिसरात ही घटना घडली.
हे ही वाचा : गावातील 22 वर्षीय तरुणाच्या प्रेमात वेडी झाली महिला, नवऱ्याचा केला भयंकर शेवट
मृत्यूचे नेमके कारण काय?
पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी (Post-mortem) रुग्णालयात पाठवले आहेत. प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आली आहे की, चट्टोपाध्याय यांना स्वतःचे मूल नसल्याने त्यांनी सूर्य याला दत्तक घेतले होते आणि दोघेही या फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते. पोलिसांनी जेव्हा फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा त्यांना घरात गॅसचा अत्यंत तीव्र वास जाणवला, ज्यामुळे या मृत्यूमागे नेमके काय कारण असावे याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
हे ही वाचा : मुंबईची खबर : हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी 22 कोटींचा प्रकल्प, काय आहे BMC चा प्लॅन?
रहस्यमय मृत्यू
अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सेठबागान परिसरातील स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि धक्क्याचे वातावरण पसरले आहे. नागरबाजार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून या रहस्यमय मृत्यूमागील नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी सखोल तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच या दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
