क्रूरतेचा कळस! केअर टेकरसोबतच ठेवले शरीरसंबंध, पत्नीने दिव्यांग पतीसोबत…
एका महिलेने बॉयफ्रेंडसह (Boyfriend) मिळून दिव्यांग पतीचा (Husband) छळ केल्याची घटना घडली आहे. तब्बल चार वर्ष महिलेने आपल्या दिव्यांग पतीला गुलामासारखी वागणूक देऊन छळ मांडला होता. हे प्रकरण कोर्टात गेल्यावर न्यायालयाने 49 वर्षीय महिलेला 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
ADVERTISEMENT

देशभरात अनैंतिक संबंधाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या घटनांमुळे गुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढले आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका महिलेने बॉयफ्रेंडसह (Boyfriend) मिळून दिव्यांग पतीचा (Husband) छळ केल्याची घटना घडली आहे. तब्बल चार वर्ष महिलेने आपल्या दिव्यांग पतीला गुलामासारखी वागणूक देऊन छळ मांडला होता. हे प्रकरण कोर्टात गेल्यावर न्यायालयाने 49 वर्षीय महिलेला 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. (wife affair with care taker and harassment with handicap husband court crime news)
इंडिपेंडेंट युके रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, 49 वर्षीय सारा समरसेट होउचे टॉम समरसेट या दिव्यांग व्यक्तीशी लग्न झाले होते. लग्नानंतर दोघांचाही सुखी संसार सुरु होता. दोघेही मस्त फिरायला, पिक्चर बघायला एकत्र जायचे. मात्र काही वर्षानंतर या गोष्टी अचानक बंद झाल्या होत्या. सारा आणि टॉमसोबत जियॉर्ज वेब नावाचा एक व्यक्ती देखील राहायचा. हा व्यक्ती या जोडप्याच्या घरी टॉमची केअऱ टेकर करण्याचे काम करायचा.सुरुवातीला जियॉर्जने टॉमची चांगली देखरेख केली.मात्र नंतर त्याने टॉमकडे दुर्लक्ष करायला सुरूवात केली होती.
हे ही वाचा: वासनांध प्रदीप कुरुळकरचे कारनामे! कार्यालयातील बाथरूममध्येच महिलांसोबत…
त्याचं झालं असं की, टॉमची देखरेख करता करता जियॉर्ज वेब आणि 49 वर्षीय सारा समरसेट होउ एकमेकांच्या प्रेमात पड़ले होते. दोघेही प्रेमात इतके आकंठ बुडाले असायची की त्यांना टॉमची देखरेख करायला वेळच नसायचा. अनेकदा तर दोघेही टॉमला घरी ठेवून फिरायला निघायचे. ज्य़ामुळे टॉम पुर्णत दुर्लक्ष झाला होता आणि त्याच्या देखरेखीकडे कोणाचेच लक्ष नव्हते. टॉमला ना वेळेवर जेवण मिळायचे, अशी त्याची अवस्था होती. अनेकदा तर त्याने घऱी कोणीच नसल्याने पॅटमध्येच लघवी केली होती. तसेच त्याची स्वच्छता देखील केली जायची नाही. त्यामुळे घाणेरड्या बेडवर त्याला पडून राहाव लागायचं. इतकंच नाही तर सारा आणि जियॉर्ज वेब मिळून त्याला गुलामासारखी वागणूक द्यायचे. एकंदरीत तब्बल 4 वर्ष हा सर्व प्रकार सुरु होता.
टॉम या सर्व प्रकारावर म्हणतो की, पत्नी सारा आणि जियॉर्ज वेबने तब्बल 5 वर्ष माझा छळ केला. पत्नी सारा मला खुप त्रास द्यायची, असा आरोप टॉमने केला आहे. यासोबत साराला भेटण्यापुर्वी माझे एक चांगले करिअर होते. मी सिनेमा,पबला जायचो, माझे अनेक मित्र होते. माझं एक चांगल आयुष्य होते. जेव्हा आम्ही दोघे एकमेकांना भेटलो, तेव्हा आम्ही या सर्व गोष्टी एकत्र करायचो.मात्र ज्यावेळेस जियॉर्जची आमच्या आयुष्यात एन्ट्री झाली, तेव्हापासून या सर्व गोष्टी बंद झाल्याचे टॉमने म्हटले आहे.