आधी Love Marriage केलं, नंतर ‘तो’ आयुष्यात आला अन्…; हत्येची Inside Story
wife kills husband : लग्नानंतर पत्नीचे एका तरुणासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे समोर आले. त्यानंतर ती अनेक तरुणांसोबत बोलत असल्याने पत्नीने नाराजी व्यक्त केली. यावरूनच वाद झाला आणि क्रूर घटना घडली.
ADVERTISEMENT
Crime News in Marathi : एका घटनेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्या घटनेची चर्चाही होतेय आणि त्याचबरोबर सोशल मीडियाच्या जडावलेल्या सवयींबद्दल चिंता व्यक्त होऊ लागली. समोर आलेली घटना अशी होती की, पतीने रील्स बनवण्यापासून रोखले म्हणून पत्नीने त्याची गळा आवळून हत्या केली. नंतर या प्रकरणात पोलिसांची एन्ट्री झाली. पोलिसांनी तपास केल्यानंतर जे समोर आलं, ते हादरवून टाकणार होतं. पती-पत्नी आणि तो असा प्रकार समोर आला. (Twist in the story of murder of husband for stopping him from making reels)
ADVERTISEMENT
घटना आहे बिहारमधील बेगुसराय येथील. रील्स बनवण्यापासून रोखले म्हणून पत्नीने पतीची हत्या केली. पोलिसांनी मयत महेश्वर रायची पत्नी रानी, त्याच्या दोन मेहुण्या आणि एका व्यक्तीला अटक केली. चौकशी केल्यानंतर जे समोर आले, ते ऐकून पोलिसही चक्रावून गेले.
प्रेमविवाहानंतर विवाहबाह्य संबंध
महेश्वर आणि रानी यांचा ६ ते ७ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. महेश्वर कामामुळे कोलकात्याला राहू लागला. त्यानंतर सासरी राहणाऱ्या रानीचे एका तरुणांसोबत अफेअर सुरू झाले.
हे वाचलं का?
हेही वाचा >> ‘… तर शरद मोहोळची हत्या झाली नसती, ‘त्या’ दोघांबद्दल पोलिसांची कोर्टात स्फोटक माहिती
रानीचे तरुणासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे तिच्या सासरच्यांना कळालं. त्यामुळे त्यांच्या वाद झाले. भांडण झाल्यानंतर रानी तिच्या आईवडिलांच्या घरी राहायला गेली आणि इन्स्टाग्रामवर रील बनवू लागली. इन्स्टावर रील्स बनवू लागल्यामुळे तिची इतर अनेक तरुणांसोबत मैत्री झाली. त्यानंतर रानी त्यांच्यासोबतही बोलत राहायची. यामुळे तिचा पती महेश्वर नाराज राहू लागला.
रानी आणि महेश्वरमध्ये काय झालं?
महेश्वर रानीच्या घरी तिला भेटायला गेला. त्यानंतर रविवारी त्यांचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. समोर आलेल्या माहितीनुसार जेव्हा महेश्वर रानीच्या घरी गेला, तेव्हा त्या दोघांमध्ये रील्स बनवणे आणि इतर मुलाशी तिचं बोलणं यावरून वाद झाले.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> ठाकरेंना 18, पवारांना 6 जागा; काँग्रेसने ठरवला ‘मविआ’चा फॉर्म्युला
रील्स बनवणे आणि विवाहबाह्य संबंधांना महेश्वरने विरोध केला. मिळालेल्या माहितीनुसार रानीने तिचा बॉयफ्रेंड आणि दोन बहिणींसह महेश्वरच्या हत्येचा कट रचला. तिने कुमारी आणि सुनीता या बहिणींसोबत मिळून त्याला फोन करू घरी बोलवले आणि गळा दाबून त्याची हत्या केली.
ADVERTISEMENT
महेश्वरची हत्या झाल्याचे कसे झाले उघड?
महेश्वरसोबत त्याचा भाऊ रुदलही कोलकाताला राहतो. रुदलने महेश्वरला फोन केला, तेव्हा तो दुसऱ्याच व्यक्तीने उचलला. त्यामुळे रुदलला शंका आली आणि त्याने याची माहिती वडिलांनी दिली. त्याने वडिलांना रानीच्या गावात पाठवले, तेव्हा महेश्वर मृतावस्थेत पडलेला होता.
हेही वाचा >> “नार्वेकरांचा निर्णय हाच भूकंप असेल”, चव्हाणांचं मोठं विधान
महेश्वरच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, त्याची पत्नी रानी ही रील्स बनवायची. त्याला विरोध केला म्हणून तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी फाशी देऊन महेश्वरची हत्या केली. आता या प्रकरणात पोलिसांनी रानी, तिचा बॉयफ्रेंड आणि तिच्या दोन बहिणींना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT