सासूचं जावयावर जडलं प्रेम, नात्यात अडसर ठरत असल्याने पतीचा काढला काटा
Wife Murdered husband Along with Son-in law : एका व्यक्तीचा मृतदेह एका नाल्यात सापडला होता. या मृतदेहावरून पोलिसांना (Police) हत्येचा उलगडा करायचा होता. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन तपास केला असता धक्कादायक कारण समोर आले होते.
ADVERTISEMENT
Wife Murdered husband Along with Son-in law : देशात अनैतिक संबंधांच्या (Extra marital Affair) अनेक घटना समोर येत असतात. या वाढत्या घटनांमुळे गुन्ह्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहेत. या घटनेत एका व्यक्तीचा मृतदेह एका नाल्यात सापडला होता. या मृतदेहावरून पोलिसांना (Police) हत्येचा उलगडा करायचा होता. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन तपास केला असता धक्कादायक कारण समोर आले होते. (wife killed husband along with son in law shocking crime story)
ADVERTISEMENT
पोलिसांना (Police) संतोष कश्यप नावाच्या एका इसमाचा मृतदेह एका नाल्यात सापडला होता. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी (Postmortam) पाठवला होता.या पोस्टमार्टमध्ये त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सूरू केला होता. या घटनेत संतोष कश्यप याचा मुलगा जितेंद्र कश्यपने पोलीस ठाण्यात वडिल बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. 13 एप्रिल 2023 ला संतोष कश्यप काहीच न सांगता कुठेतरी निघून गेले होते,असे तक्रारीत त्याने म्हटले होते.
हे ही वाचा : हत्येपूर्वी अशरफने नाव घेतलेल्या गुड्डू मुस्लिमला नाशिकमधून अटक, सत्य काय?
पत्नीशी सतत भांडणं व्हायची
पोलिसांनी (Police) या प्रकरणी संतोष कश्यप यांच्या घरी जाऊन कुटूंबियांची चौकशी केली होती.या चौकशीत त्याना संतोषचे पत्नीसोबत अनेकदा वाद व्हायचे अशी माहिती मिळाली होती. मात्र नेमक्या कोणत्या कारणावरून वाद व्हायचे, हे सांगण्यास पत्नीने नकार दिला होता. त्यामुळे पत्नीवर पोलिसांचा संशय बळावला होता.
हे वाचलं का?
पोलिसांनी पत्नीला पोलीसी खाक्या दाखवताच तिने हत्येचा उलगडा केला. आरोपी महिलेचे तिच्या जावयासोबत अनैतिक संबंध (Extra marital Affair) होते. या अनैतिक संबंधांची माहिती तिचे पती संतोष कश्यप यांना लागली होती. त्यामुळे अनेकदा संतोष तिच्यावर संशय घ्यायचा. या संशयातून दोघांमध्ये दररोज वाद देखील व्हायचे. या वादातून आरोपी पत्नी जावयासह मिळून पतीची हत्या केली. ही संपूर्ण घटना हत्या वाटू नये आणि अपघात वाटावा यासाठी मृतदेह नाल्यात फेकल्याची कबूली दिली.
दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी (Police) पत्नीला आणि जावयाला ताब्यात घेतले आहे.ही घटना उघडकीस येताच संपूर्ण गाव हादरलं होतं. जांजगीर चांपा येथे ही धक्कादायक घटना घडलीय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : याच पिस्तूलमधून अतिक आणि अशरफला गोळी मारली होती; किती आहे किंमत?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT