शारीरिक संबंधासाठी पती पुढे सरसावला पत्नीने अचानक केला प्रायव्हेट पार्टवर हल्ला, घालावे लागले 7 टाके

उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये एका तरुणाने पत्नीसोबत शारीरिक संबंध बनवण्याचा प्रयत्न केला असता पत्नीने पतीच्या प्रायव्हेट पार्टवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Wife opposes physical relation with husband Suddenly wife attacks his private part with blade Husband has a different suspicion
प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीने दिला पतीसोबत शारीरिक संबंधाला नकार...

point

नंतर ब्लेडने प्रायव्हेट पार्टवरच केला हल्ला...

Crime News: उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये लग्नाच्या अवघ्या 4 महिन्यानंतर एका तरुणाने त्याच्या पत्नीवर गंभीर आरोप करत तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून ते आजपर्यंत पत्नीने शारीरिक संबंध प्रस्थापित करू न दिल्याचा आरोप पीडित पतीने केला आहे. एके दिवशी शारीरिक संबंध बनवण्याचा प्रयत्न केला असता पत्नीने पतीच्या प्रायव्हेट पार्टवर जीवघेणा हल्ला केला. ज्यामुळे त्याला 7 टाके घालावे लागले, असं पीडित तरुणाने सांगितलं. पीडित पतीचे हे आरोप ऐकून पोलिसांना सुद्धा धक्का बसला आहे. 

पत्नीचा शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याला नकार...

संबंधित प्रकरण बिजनौरच्या मंडावर पोलीस स्टेशनमधील असल्याची माहिती आहे. येथील कला गावातील रहिवासी असलेल्या चांदवीर सिंग उर्फ चांदने त्याची पत्नी तनु हिच्यावर गंभीर आरोप करत तिच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारपत्र दाखल केलं. पत्नीच्या विरोधात तक्रार करताना चांद म्हणाला, "29 एप्रिल 2025 मध्ये माझं तनुसोबत लग्न झालं. लग्न झाल्यानंतर सुरुवातीपासूनच तनु माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणं टाळत होती. मी तिच्यासोबत प्रेमाच्या गोष्टी बोलत असताना देखील ती घरातील कामांचा बहाणा सांगून खोलीतून बाहेर निघून जायची. बऱ्याचदा, ती फोनवर कोणाशी तरी बोलत असायची आणि मला बघितल्यानंतर लगेच फोन ठेवून द्यायची."

पीडित तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, 20 ऑगस्टच्या संध्याकाळी 6 वाजता पतीने त्याच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध बनवण्याचा प्रयत्न केला असता तनु संतापली आणि तिने चांदच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने हल्ला केला. चांदच्या रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकून त्याचे वडील आणि घरातील इतर सदस्य देखील खोलीत आले आणि त्याला रक्ताने माखलेल्या अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर, चांदच्या प्रायव्हेट पार्टवर 7 टाके घालण्यात आले. 

हे ही वाचा: अनोखी प्रेमकथा! 18 वर्षीय तरुणाने 50 वर्षीय महिलेसोबत केलं लग्न, कुटुंबियांना आणली लाज...

पत्नीने सुद्धा केले गंभीर आरोप

चांदवीर सिंगने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून प्रकरणासंदर्भात कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. मंडावर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदच्या पत्नीने देखील पतीवर गंभीर आरोप केले आहेत. नवीन लग्न झाल्यानंतर तनु माहेरच्या लोकांशी बोलत असताना तिचा पती चांद ती दुसऱ्याच तरुणासोबत बोलत असल्याचा पत्नीवर संशय घ्यायचा. तसेच, तो दररोज पत्नीवर बळजबरी करून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता. यामुळे तनुला खूप त्रास आणि वेदना सहन कराव्या लागल्या असल्याचा आरोप पीडित तरुणाच्या पत्नीने केला. याच कारणामुळे रागाच्या भरात तिने पतीच्या प्रायव्हेट पार्टवरच हल्ला केल्याचं तिने सांगितलं. 

हे ही वाचा: प्रेमात मिळाला धोका! ...म्हणून बॉयफ्रेंडच्या घरी गेली अन् दोघांमध्ये वाद पेटला, थेट तिसऱ्या मजल्यावरून उडी...

पत्नीला केली अटक 

पोलिसांनी प्रकरणासंदर्भात कारवाई करत आरोप तनुला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. नव्या नवरीच्या या कारनाम्यामुळे गावातील लोक देखील चकित झाले आहेत. गावात सर्वत्र चांदवीर आणि तनुची चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळतंय. 

हे वाचलं का?

    follow whatsapp