आईला शेजाऱ्यासोबत पाहिलं नग्नावस्थेत, अन् मुलासोबत घडली थरकाप उडवणारी घटना
एका महिलेला तिच्या 8 वर्षाच्या मुलाने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करताना पाहिलं होतं. ज्यानंतर महिलेने मुलाची हत्या केल्याची घटना नोएडामध्ये घडली.
ADVERTISEMENT
नोएडा: नोएडाच्या (Noida) बदलपूर भागात एका भुरी नावाच्या महिलेने आपल्या 8 वर्षांच्या मुलाची अंकितची हत्या केली आणि त्याचा मृतदेह 150 किमी दूर संभल या जिल्ह्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना नुकतीतच समोर आली आहे. आपल्या पोटच्या मुलाला महिलेने अशा पद्धतीने नेमकं का संपवलं याबाबतचं नेमकं कारणही आता अखेर समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचा मुलगा (Son) अंकित याने आपल्या आईला (Mother) शेजारीच राहणारा ओमपाल याच्यासोबत नग्नावस्थेत पाहिले होते. त्यानंतर बदनामीच्या भीतीने आईने आपल्या मुलाची हत्या (Murder) केली. या प्रकरणी आरोपी महिला भूरी हिच्यासह तिचा प्रियकर ओमपाल, मानक आणि अमर सिंह अशा एकूण चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. (woman 8 year old son immoral relationship with neighbor mother killing child noida crime news)
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
असं म्हणतात की आई आपल्या मुलावर सर्वात जास्त प्रेम करते, पण भूरीसाठी तिची वासना ही तिच्या मुलापेक्षाही जास्त प्रिय बनली. महिलेने आपल्या मुलाच्या प्रेमापुढे आपल्या वासनेला प्राधान्य दिले आणि या वासनेच्या आगीत तिने आपल्या निष्पाप मुलाचाही बळी घेतला. याच संपूर्ण घटनेविषयी आम्ही आपल्याला सांगणार आहोत की, ग्रेटर नोएडामध्ये एक आईने वासनेपोटील आपल्या मुलाची नेमकी कशी हत्या केली.
हे वाचलं का?
बदलपूर येथील रहिवासी असलेला आठ वर्षीय अंकित हा 2 जुलै रोजी संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता झाला होता. 7 जुलै रोजी त्याचा मृतदेह पोलीस ठाणे जुनवई, जिल्हा संभल येथे आढळून आलेला, तपासादरम्यान मृत बालक अंकितची आई भुरी हिचे शेजारील भाडेकरू ओमपालसोबत अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांना समजले. हेच अनैतिक संबंध सुरू असताना अंकितने दोघांना पाहिले होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> DRDO Scientist : प्रदीप कुरुलकरने कंत्राटासाठी महिलेसोबत ठेवले शरीर संबंध
दरम्यान, बदनामीच्या भीतीने भुरीने ओमपालच्या सांगण्यावरून मुलगा अंकितची हत्या केली होती. ज्यामध्ये भुरीचा मेहुणा मानक याने तिला मदत केली होती. यावेळी मानक याच्यासोबत मृत मुलाच्या बहिणीचे सासरे अमर सिंह यांनी देखील मदत केली होती. त्याने अंकितचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकण्यात मदत केलेली. भुरी आणि मानक, अमरसिंग आणि ओमपाल यांना पोलिसांनी अटक करून आता तुरुंगात पाठवले आहे. मानकच्या सांगण्यावरून पोलिसांनी अंकितचा मृतदेह फेकण्यासाठी ज्या दुचाकीचा वापर केला होता ती देखील जप्त करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Crime: लव्हस्टोरीचा भयंकर शेवट! गर्लफ्रेंडनेच केली बॉयफ्रेंडची हत्या, कारण….
पोलीस उपायुक्त अनिल कुमार यादव यांनी सांगितले की, 5 जुलै रोजी कल्याण नावाच्या व्यक्तीने बदलपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली की त्यांचा आठ वर्षांचा मुलगा अंकित 2 जुलैपासून बेपत्ता आहे. त्यांनी सांगितले की, 7 जुलै रोजी बेपत्ता अंकितचा मृतदेह संभल जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला सापडला होता. यादवच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी मुलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले, ज्यामध्ये असे आढळून आले की, प्रथम त्याला विष देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु जेव्हा त्याचा मृत्यू झाला नाही तेव्हा त्याला पाण्यात फेकून देण्यात आले. ज्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT