Crime: पाचव्या पतीला इन्सुलिनमधून दिलं विष; महिलेच्या क्रूर कृत्याने पोलिसही हादरले

मुंबई तक

पाचव्या पतीला विष देऊन मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी पत्नीला पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिची तुरुंगात रवानगी केली आहे.

ADVERTISEMENT

A woman poisoned her fifth husband in Texas, USA
A woman poisoned her fifth husband in Texas, USA
social share
google news

Crime News in Marathi : पाचव्या पतीला विष देऊन मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी पत्नीला पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिची तुरुंगात रवानगी केली आहे. सध्या तिच्याविरुद्ध चौकशी सुरू आहे. हे प्रकरण अमेरिकेतील टेक्सासचे आहे. दरम्यान, या महिलेवर चौथ्या पतीच्याही हत्येचा आरोप होत आहे. या प्रकरणाची फाईलही उघडण्यात आली आहे. (A woman poisoned her fifth husband in Texas, USA)

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, सारा हार्ट्सफील्ड असं या महिलेचे नाव आहे. हार्ट्सफिल्ड अमेरिकेच्या आर्मीमध्ये उच्चाधिकारी होती. हार्ट्सफिल्डचा 46 वर्षीय पती मधुमेहाचा रुग्ण होता. यामुळे त्याला रोज इन्सुलिन घ्यावे लागत होते. नेहमीप्रमाणे त्याने इन्सुलिन घेतले मात्र यावेळी 6 तासांनी त्यांना त्रास जाणवू लागला. प्रकृती बिघडल्यानंतर डॉक्टरांना बोलावण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

यापूर्वी झाली होती 4 लग्न :

हार्ट्सफिल्डचे यापूर्वी 4 लग्न झाली आहेत. यातील चौथ्या आणि पाचव्या पतीला मारल्याचा तिच्यावर आरोप आहे. तर दुसऱ्या पतीला मारहाण केल्याचा आरोप आहे. 5 वर्षांपूर्वी म्हणजे 2018 मध्ये, हार्ट्सफिल्डवर चौथा पती डेव्हिड ब्रॅगचा छळ करणे आणि नंतर त्याला गोळ्या घालणे अशा गंभीर आरोपांचा सामना करावा लागला होता. त्यावेळी हार्ट्सफिल्डने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचे सांगितले होते. आता या प्रकरणाची फाईलही पुन्हा उघडण्यात आली आहे.

हे ही वाचा : फॅशन डिझायनर तरूणीची आत्महत्या, पण शेवटचा व्हि़डिओ का होतोय व्हायरल?

या 2 प्रकरणांशिवाय हार्ट्सफिल्डवर इतरही अनेक गंभीर आरोप आहेत. मार्च 1996 मध्ये, हार्ट्सफील्डला तिचा दुसरा पती, मायकेल ट्रॅक्सलर यांच्यावर हल्ला केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. या प्रकरणात हार्ट्सफिल्ड आठवडाभर तुरुंगात राहिली होती. त्यानंतर पतीने केस मागे घेतल्यावर ती बाहेर आली.

हे वाचलं का?

    follow whatsapp