बेडरुममध्ये तरुणीचा दोन मुलांसोबत रोमान्स, पतीने रंगेहात पकडलं अन् जागेवर संपवलं, 4 महिन्यांपूर्वीच झालेलं लव्ह मॅरेज
लग्न झाल्याच्या केवळ चार महिन्यांनंतर, पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून निर्घृण हत्या केली. आश्चर्याची बाब म्हणजे, दोघांनी एकमेकांसोबत लव्ह मॅरेज झालं होतं. घटनेच्या काही तासांतच आरोपीने पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून स्वत:ला सरेंडर केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बेडरुममध्ये तरुणीचा दोन मुलांसोबत रोमान्स
पतीने रंगेहात पकडलं अन् जागेवर संपवलं
Crime News: उत्तर प्रदेशातील कानपूर येथून अनैतिक प्रेमसंबंधाचं भयानक प्रकरण उघडकीस आलं आहे. लग्न झाल्याच्या केवळ चार महिन्यांनंतर, पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून निर्घृण हत्या केली. आश्चर्याची बाब म्हणजे, दोघांनी एकमेकांसोबत लव्ह मॅरेज झालं होतं. घटनेच्या काही तासांतच आरोपीने पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून स्वत:ला सरेंडर केलं. आता पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. संबंधित घटना ही महाराजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रूमा परिसरात घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सचिन सिंह हा फतेहपूर जिल्ह्यातील माहनपूर गावाचा रहिवासी आहे. शनिवारी त्याने पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि पोलिसांकडे तक्रार केली. तो म्हणाला की, "मी माझ्या पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली. हत्येनंतर, तिचा मृतदेह चादरीत गुंडाळून ठेवला आहे." आरोपीचं बोलणं ऐकून पोलिसांना सुद्धा मोठा धक्का बसला. पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान, सचिनने घडलेली घटना सांगितली आणि त्यावेळी पोलिसांना सुद्धा मोठा धक्का बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सचिनने चार महिन्यांपूर्वी त्याच्या गावातील श्वेता सिंहसोबत कुटुंबियांच्या विरोधात जाऊन कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर, ते दोघे सूरतला निघून गेले आणि तिथे सचिनने एका प्रायव्हेट कंपनीत काम करण्यास सुरूवात केली. मात्र, एक महिन्यानंतर ते पुन्हा कानपूरला परतले आणि महाराजपूरच्या रूमा परिसरात भाड्याच्या घरात राहू लागले. तिथे, सचिन रिक्षा चालवून त्याचा आणि त्याच्या पत्नीचा उदरनिर्वाह करत होता. 13 जानेवारी रोजी तो फतेहपूरच्या चौडगरा येथे गेला होता आणि शनिवारी रात्री जवळपास 1 वाजताच्या सुमारास घरी परतला.
हे ही वाचा: वहिनीचे अनैतिक संबंध, तिच्यासह प्रियकराची हत्या अन् बहिणीला सुद्धा... शेवटी पोलीस ठाण्यात पोहोचून सरेंडर
मात्र, घरी पोहोचल्यानंतर सचिनने जे काही पाहिलं त्यामुळे तो प्रचंड संतापला. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याची पत्नी श्वेता दोन तरुणांसोबत अंथरूणावर आक्षेपार्ह अवस्थेत होती. संबंधित तरुण हे जवळच्याच कॉलेजमध्ये इंजीनिअरिंगचं शिक्षण घेत असून ते सचिनच्या घरासमोरच राहायचे. त्यावेळी, रागाच्या भरात आरोपी सचिनने त्यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्वेता तसेच तिच्या साथीदारांनी त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. घरातील आवाज ऐकून शेजाऱ्यांनी 112 नंबरवर कॉल केला. त्यानंतर, पोलीस तिथे पोहोचले आणि सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. तिथे चौकशीनंतर, पोलिसांनी सचिन आणि श्वेताला समजावून घरी पाठवलं आणि इतर दोन तरुणांना ताब्यात घेतलं.










