Crime : माणुसकीला काळीमा! 1500 रूपयांसाठी अनुसूचित जातीच्या महिलेला नग्न करून मारहाण,चेहऱ्यावर लघवी…

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

women stripped and beaten forced to drink urine bihar patna shocking crime story
women stripped and beaten forced to drink urine bihar patna shocking crime story
social share
google news

बिहारची (Bihar) राजधानी पाटण्यात 1500 रूपयांसाठी एका अनुसूचित जमातीच्या महिलेसोबत अमानवीय कृत्य घडल्याची घटना समोर आली आहे. पीडीत महिलेला नग्न करून मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर तिच्या चेहऱ्यावर लघवी केली गेली आणि तिला लघवी पाजण्याचा देखील प्रयत्न झाला. या सर्व घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपींविरुद्ध एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नाही आहे. या घटनेचा अधिक तपास सूरू आहे. (women stripped and beaten forced to drink urine bihar patna shocking crime story)

पाटणा सिटीच्या खुशरूपुर पोलीस ठाणे हद्दीतील गावात ही घटना घडली आहे. या गावातील महिलेने सावकार प्रमोद सिंह यांच्याकडून काही महिन्यापूर्वीच 1500 रूपये उधार घेतले होते. ही रक्कम पीडीत महिलेने व्याजासकट प्रमोदला परत देखील केली होती. मात्र प्रमोद सिंह या गोष्टीला टाळाटाळ करत होता आणि पीडीत महिलेच्या घरी गुंड पाठवून पैशाचा तगादा लावायचा.एकंदरीत प्रमोद सिंहने पीडीत महिलेचा छळच मांडला होता.

हे ही वाचा : Shiv sena MLAs case : सुनावणीत काय घडलं? ठाकरेंच्या नेत्याने सांगितली Inside Story

पीडीत महिलेने दिलेल्या माहितीनूसार, शनिवारी सकाळी प्रमोदने मला मारहाण केली आणि विवस्त्र करून गावात फिरवण्याची धमकी दिली होती. या धमकीची माहिती पोलिसांना दिली होती. मात्र पोलिसांनी प्रमोद विरोधात कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे रात्री 10 च्या सुमारास मी घराबाहेर पडले, प्रमोद आणि त्याचा मुलगा अंशु आणि त्याच्या चार साथिदारांनी मला पकडले होते. तुझ्या नवऱ्याला आम्ही डांबून ठेवले आहे, जर तू आमच्यासोबत आली नाहीस तर आम्ही तुझ्या नवऱ्याला मारून टाकू अशी धमती प्रमोदने पीडीत महिलेला दिली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या धमकीला घाबरून पीडीत महिला आरोपींसोबत गेली होती. पीडीत महिलेला प्रमोदच्या घरी आणले गेले आणि तिला विवस्त्र करून लाठी-काठीने बेदम मारहाण करण्य़ात आली. या मारहाणीनंतर प्रमोदचा मुलगा अंशूने माझ्या चेहऱ्यावर लघवी केली. त्यानंतर मला लघवी पाजण्याचा देखील प्रयत्न केला. अशाप्रकारे या अनुसूचित जमातीच्या महिलेचा छळ काढला होता.

दरम्यान महिलेला झालेल्या मारहाणीत तिला गंभीर दुखापत झाली आहे. यानंतर पीडीत महिलेने आरोपींच्या तावडीतून सूटका करून स्वत:च घर गाठले होते.

ADVERTISEMENT

या प्रकरणी आता पीडीत महिलेच्या तक्रारीवरून प्रमोद आणि त्याचा मुलगा अंशु यांच्याविरोधात एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी पीडीत महिलेच्या घरासमोर सूरक्षा तैनात केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक झाली नाही आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : MLA Disqualification Case : ‘सर्व याचिकांवरील सुनावणी एकत्रित घ्या’, ठाकरे गटाचा युक्तिवाद

    follow whatsapp

    ADVERTISEMENT