वडील आणि भावांकडून बेदम मारहाण, अखेर तरुणाचा जगीच मृत्यू अन्... पोलिसांना सांगितली भलतीच कहाणी
एका 28 वर्षांच्या तरुणाच्या हत्येने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. संबंधित तरुणाच्या वडील आणि भावाने मिळून ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वडील आणि भावांकडून बेदम तरुणाला मारहाण

अखेर मारहाणीत तरुणाचा जगीच मृत्यू अन्...

आरोपींनी पोलिसांना सांगितली भलतीच कहाणी
Murder Case: हरियाणातील फरीदाबाद येथे एका 28 वर्षांच्या तरुणाच्या हत्येने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. संबंधित तरुणाच्या वडील आणि भावाने मिळून ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर, आरोपींनी हत्येनंतर अगदी हुशारीने हत्येला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला.
मृत तरुणाचे नाव कृष्णा असून तो धनीरामचा मुलगा होता, अशी माहिती आहे. प्रकरणातील 28 वर्षीय पीडित तरुण मजूर म्हणून काम करायचा तसेच त्याला व्यसन देखील होतं. पोलिसांच्या माहितीनुसार, 15 सप्टेंबरच्या रात्री संबंधित कुटुंबियांमध्ये भांडण झालं. आरोपी वडील म्हणजेच धनीराम आणि त्यांची दोन मुलं, सुदामा आणि सूरज यांनी कृष्णावर हल्ला केला. त्यावेळी, रागाच्या भरात त्यांनी पीडित तरुणाला इतकी मारहाण केली, की कृष्णाचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.
आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न...
हत्येनंतर, तिन्ही आरोपींना हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ते पकडले जातील, अशी भिती होती. याच कारणामुळे त्यांनी एक योजना आखली. आरोपींनी कृष्णाचा मृतदेह दोरीला लटकवला आणि त्यांच्या मुलाने आत्महत्या केली असल्याची पोलिसांना माहिती दिली. ही घटना एका सामान्य आत्महत्येप्रमाणे दाखवण्याचा आरोपींनी प्रयत्न केला.
हे ही वाचा: ऑनलाइन पुस्तके विकणं पडलं महागात! क्यूआर कोड स्कॅन केला अन् तब्बल 1.5 लाख... मुंबईतील महिलेसोबत काय घडलं?
शेजाऱ्यांनी आणलं उघडकीस
पण गुन्हा कितीही हुशारीने लपवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य अखेर बाहेर येतं. या प्रकरणात नेमकं तेच घडलं. पोलिसांच्या कारवाईची माहिती शेजाऱ्यांना कळताच शेजारील लोकांनी सत्य उघडकीस आणण्याचं धाडस केलं. कृष्णाने आत्महत्या केली नसून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याचं त्यांनी पोलिसांनी सांगितलं. तसेच, मृताचे वडील आणि त्याच्या भावाने हा गुन्हा घडवून आणल्याचं त्यांनी सांगितलं.