Crime: दोरीने गळा घोटला, अल्पवयीन मुलाने मोठ्या भावालाच का संपवलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Younger brother killed elder brother due to immoral relationship, strangulated
Younger brother killed elder brother due to immoral relationship, strangulated
social share
google news

Crime News: बिहारमधील बेगुसरायमध्ये (Begusarai in Bihar) छठ साजरी करण्यासाठी गावामध्ये आलेल्या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील हत्येमध्ये (Murder) सहभागी असलेल्या 5 जणांना अटक केली आहे. त्यामध्ये मृताची पत्नी आणि मृताच्या भावाचाही समावेश आहे. भाऊ आणि वहिणीचे अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अनैतिक संबंधामुळेच हे हत्याकांड घडवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितेल.

ADVERTISEMENT

मृतदेह शेतात फेकला

बछवारा पोलीस स्टेशन हद्दीतील राजापूर गावात राहणारा अजय साहनी याची 19 नोव्हेंबर रोजी त्याची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. यानंतर त्याचा मृतदेह गावाबाहेर शेतात फेकून देण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसपी योगेंद्र कुमार यांनी तेघरा डीएसपी रवींद्र मोहन प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची टीम तयार करुन या हत्येचा तपास केला, त्यानंतर हा हत्येचा उघड झाला.

भावाबरोबर अनैतिक संबंध

मृत अजय साहनीची पत्नी अंजली देवी हिचे अजयच्या धाकट्या भावाबरोबर अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. अजयचा धाकटा भाऊ धरमवीर साहनी याचे अजयच्या पत्नीबरोबर अनैतिक संबंध होते, हे काही महिन्यापूर्वी अजयला माहिती झाले होते. तर काही महिन्यापूर्वी अजयने आपल्या भावाला आणि पत्नीला आक्षेपार्ह अवस्थेत पकडले होते. ती दोघं आक्षेपार्ह अवस्थेत सापडल्यानंतर त्या दोघांनाही मारहाण करुन भावाला घरातून हाकलून देण्यात आले होते. त्यानंत छठ दिवशी अजय आपल्या पत्नीसह घरी आला होता.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> ”आरक्षण हवंय, पण बाबासाहेबांच नाव घ्यायचं नाही”, गोपिचंद पडळकरांनी जरांगेंना सुनावलं

गळा आवळून हत्या

भावाला घरातून हाकलून दिल्यानंतर छठ पूजेदरम्याने अजय घरी होता. त्यानंतर 19 नोव्हेंबर रोजी रात्री अजयच्या पत्नीने तिच्या दिरासह अजयलाही गावाबाहेरील धरणाच्या काठावर बोलावले होते. त्यावेळी तिथे दोघांनी अजयचा गळा आवळून हत्या केली होती. त्याचा मृत्यू झाल्यावर त्याचा मृतदेह शेतात फेकून देण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी अजयचा भाऊ धरमवीर साहनी, पत्नी अंजली देवी, भावाचे मित्र चंदन साहनी, सौरभ साहनी आणि गौरी साहनी यांना अटक करण्यात आली आहे.

हत्येत पत्नीचाही समावेश

अटक केलेल्या सर्वांनी त्यांनी हत्या केल्याचे कबूल केले आहे. एसपी योगेंद्र कुमार यांनी सांगितले की, हत्येनंतर 4 दिवसांत संपूर्ण प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर आपल्या पत्नीबरोबर भावाचे अनैतिक संबंध आल्याचे भावाचे लक्षात येताच भावाने आपल्याच भावाच्या हत्येचा कट रचला होता. भावाची हत्या करण्यामध्ये त्याच्या पत्नीचाही समावेश होता. हत्या झाल्यानंतर पोलिसांनी तपास करुन आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी हत्या केल्याचे कबूल केले असून त्यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> धावत्या बसमध्ये कंडक्टरचा चिरळा गळा, तरुणाच्या कृत्याने प्रवासी हादरले

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT