‘त्याची अवस्था कुत्र्यासारखी…’, हिंदुस्थानी भाऊची आव्हाडांवर बोचरी टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

YouTuber Hindustani Bhau criticizes mla Jitendra awad for his controversial statement about prabhu ram
YouTuber Hindustani Bhau criticizes mla Jitendra awad for his controversial statement about prabhu ram
social share
google news

Hindusthani Bhau: शिर्डीमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्राबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यासह देशात त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. ही टीका चालू असतानाच आता सोशल मीडियावर, ‘रुको जरा सबर करो’ या वाक्यामुळे लोकप्रिय झालेला प्रसिद्ध युट्यूबर हिंदुस्थानी भाऊ यांनीही त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सनातन धर्म आणि देवीदेवतांवर बोलणाऱ्यांची अवस्था वाईट झाल्याचे सांगत त्यांची अवस्था कुत्र्यापेक्षा वाईट झाल्याचे सांगत हिंदुस्थानी भाऊ म्हणजेच विकास पाठक यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

ADVERTISEMENT

‘ते’ वादग्रस्त वक्तव्य

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना, राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खात आहोत. 14 वर्षे वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?’, असा सवाल त्यांनी शिबिरामध्ये बोलताना उपस्थित केला होता.

हे ही वाचा >> Naresh Goyal : “मला तुरुंगातच मरु द्या”, जेट एअरवेजच्या संस्थापकांना न्यायालयात अश्रू अनावर

आव्हाडांच्या पुतळ्याचे दहन

प्रभूरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. त्यांच्या पुतळ्याचे दहनही अनेक ठिकाणी केले आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा हिंदुस्थानी भाऊ यांनी त्यांच्यावर टीका करत सनातन धर्मावर टीका करणाऱ्यांची अवस्था कुत्र्यापेक्षाही वाईट झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसत आहे.

हे वाचलं का?

‘सनातन’वर बोलणाऱ्यांची अवस्था…

प्रभूरामचंद्राबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्याविरोधात जोरदार आंदोलन, निषेध व्यक्त करण्यात आले. त्यानंतर आता हिंदुस्थानी भाऊंनीही त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. हिंदुस्थानी भाऊंनी त्यांच्यावर टीका करताना ज्यांनी ज्यांनी सनातन धर्मावर आणि आमच्या देवीदेवतांविरोधात वक्तव्य केली आहेत. ज्यांनी अपमान केला आहे. त्यांची परिस्थिती कुत्र्यापेक्षाही वाईट झाली आहे. मग तो राजकीय पक्ष असो नाही तर राजकीय नेता असो. त्यांच्यापेक्षा कुत्र्याची अवस्था चांगली असते. तर आता कुत्र्यापेक्षाही त्यांची अवस्था वाईट झाली आहे. कारण जी जी माणसं सनातन धर्माविरोधात असं बोलतील त्यांची अशाच पद्धतीने वाट लागणार असल्याची बोचरी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

हे ही वाचा >> Sharad Mohol : गँगस्टर शरद मोहोळ हत्या कटात दोन वकिलही! नावे आली समोर

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT