मोबाइल बिझी आला अन्, बहीण-भावाने जीव गमावला; काय आहे नेमकं प्रकरण?

मोबाइल व्यस्त असल्याच्या कारणावरून बहीण-भावामध्ये वाद झाला अन् दोघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हिंगोलीमध्ये घडली आहे.
मोबाइल बिझी आला अन्, बहीण-भावाने जीव गमावला; काय आहे नेमकं प्रकरण?
suicide of siblings due to mobile dispute shocking incident in hingoli(प्रातिनिधिक फोटो)

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथील दोन सख्ख्या चुलत बहीण-भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. ऐश्वर्या गोविंद पंडित (वय 18 वर्ष) आणि आनंद विलास पंडित (वय 28 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.

नेमकी घटना काय?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आनंद पंडित हा आपली बहीण ऐश्वर्या हिचा फोन सतत बिझी येत असल्याने तिच्यावर खूपच नाराज होता. त्यामुळे काल (13 जून) आनंदने ऐश्वर्याला थेट सवाल केला की, 'तुझा फोन सतत व्यस्त का असतो? तू नेहमी कोणाशी बोलतेस?'

थेट असा प्रश्न विचारल्यमुळे ऐश्वर्या आणि आनंद यांच्यात बराच वाद झाला. यावेळी भाऊ आनंदने रागाच्या भरात ऐश्वर्याच्या कानशिलात लगावली. याच गोष्टीचा ऐश्वर्याला प्रचंड राग आला आणि याच रागाच्या भरात ऐश्वर्याने राहत्या घरी 13 जून रोजी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, आपण केलेल्या कृत्यामुळे बहिणीने आत्महत्या केल्याची गोष्ट आनंदच्या मनाला प्रचंड चटका लावून गेली आणि त्यामुळेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 14 जून रोजी आनंद पंडितने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह डोंगरकडा येथील एका शेतातील झाडाच्या फांदीला गळफास घेतलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्यानंतर पंचनामा करुन त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि नंतर शवविच्छेदनासाठी पाठविला.

बहिणीच्या मृत्यूप्रकरणी आपल्या दोषी ठरविण्यात येईल याच एका भीतीपोटी आनंद पंडितने आत्महत्या केल्याचा अंदाज आता पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलीस आता या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

suicide of siblings due to mobile dispute shocking incident in hingoli
Facebook वर पोस्ट शेअर करुन भाजप नेत्याची आत्महत्या, नेमकं काय घडलं?

ऐश्वर्याच्या आत्महत्येनंतर तिच्या मृत्यूप्रकरणी बाळापूर आखाडा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर आनंदच्या मृत्यूप्रकरणी कुठलीही नोंद अद्याप झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

फक्त फोन बिझी येत असल्याने झालेला वाद दोघा बहीण-भावाचा जीव जाण्यास कारणीभूत ठरल्याने आता या सगळ्या प्रकरणी गावात एकच खंत व्यक्त केली जात आहे. याआधी देखील मोबाइलवरुन झालेला वाद किंवा तशाच प्रकारच्या क्षुल्लक कारणावरुन आतापर्यंत काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता या एकूणच सगळ्या गोष्टींवर विचार करण्याची वेळ आली असल्याचं सजग नागरिकांचं मत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in