मैत्रिणीला घरी बोलावलं, शीतपेयातून बियर पाजत केला बलात्कार; आरोपी अटकेत
वाढदिवसाच्या निमीत्ताने घरी बोलावून शीतपेयातून बिअर पाजून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीवरुन ठाणे पोलिसांनी आरोपी गणेश उर्फ जितू अशोक सुरवसेला गोव्यातून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीला वाढदिवसाचं निमीत्त साधून घरी राहण्यासाठी बोलावलं. यावेळी पार्टीदरम्यान आरोपीने शीतपेयातून बियर पाजली. यानंतर तरुणी नशेत असतानाचा […]
ADVERTISEMENT

वाढदिवसाच्या निमीत्ताने घरी बोलावून शीतपेयातून बिअर पाजून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीवरुन ठाणे पोलिसांनी आरोपी गणेश उर्फ जितू अशोक सुरवसेला गोव्यातून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीला वाढदिवसाचं निमीत्त साधून घरी राहण्यासाठी बोलावलं. यावेळी पार्टीदरम्यान आरोपीने शीतपेयातून बियर पाजली. यानंतर तरुणी नशेत असतानाचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. यावेळी आरोपीने मोबाईलमध्ये चित्रीकरण करत अश्लील फोटोही काढले. पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर तिने आरोपीशी भेटणं आणि बोलणं बंद केलं.
घरगुती भांडणातून पतीची तक्रार करायला गेलेल्या महिलेवर पोलिसाचा बलात्कार
परंतू यानंतर आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग करतानाचा व्हिडीओ आणि अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 2019 ते 2022 या कालावधीत वारंवार तिच्यावर बलात्कार केला. 2022 मध्ये पीडित तरुणीचं लग्न ठरल्याची माहिती मिळताच आरोपीने सोशल मीडियावर तिच्या नावाने खोटं अकाऊंट तयार करत, पीडित तरुणीच्या मित्रांना आणि नातेवाईकांना सेक्स चॅट आणि व्हिडीओ कॉल करायला सुरुवात केली.