इतिहासातील सर्वात मोठी खंडणी, अटावाल्पाचा खून अन् इंका साम्राजाचा शेवट

इंका सम्राट अटावाल्पा आणि स्पॅनिश आकम्रक असलेला प्रान्सिको पझारो यांच्यात एक युद्ध झाले.
इतिहासातील सर्वात मोठी खंडणी, अटावाल्पाचा खून अन् इंका साम्राजाचा शेवट
francisco pizarro | AtahualpaWikipedia

इतिहासात अनेक घटना घडून गेलेल्या असतात प्रत्येक गोष्ट आपल्या लक्षात राहत नाही किंवा आपल्याला त्याचा विसर पडतो. आज आम्ही तुम्हाला इतिहासातील सर्वात मोठ्या खंडणीची गोष्ट सांगणार आहोत. ही घटना आहे सोळाव्या शतकातील, ज्यावेळी ख्रिस्तोफर कोलंबसनं 'कॅरेबियन बेटांचा' शोध लावला. घटना जाणून घ्यायच्या अगोदर याची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊ.

इंका सम्राट अटावाल्पा आणि स्पॅनिश आकम्रक असलेला प्रान्सिको पझारो यांच्यात एक युद्ध झाले. १६ नोव्हेंबर १५३२ रोजी पेरुमधील 'काहामार्का' शहरात या दोघांची पहिली भेट झाली. त्यांची भेट ही युरोप आणि अमेरिका संबंधातील सर्वात नाट्यपुर्ण भेट मानली जाते. अटावाल्पा हा नव्या जगातील सर्वात मोठ्या आणि प्रगत राज्याचा राजा होता तर पझारो हा युरोपातील सर्वात शक्तीमान राजाचा प्रतिनिधी म्हणून तिथे गेला होता.

पझारोकडे फक्त १६८ स्पॅनिश सैनिक होते जे अत्यंत बेशिस्त होते. तर अटावाल्पा भोवती ८०,००० सैनिकांचा गरडा होता. पझारो हा अनोळखी प्रदेशात आल्याने त्याला त्या प्रदेशाची फारशी माहिती नव्हती. अटावाल्पाने स्थानीक जमातींवरती विजय मिळवत आपली प्रदेशावरती पकड मजबूत केली होती. अशा परिस्थीतीत अटावाल्पा आणि पझारोची नजरानजर झाली.

आता इथून सुरु होते इतिहासातील सर्वात मोठ्या खंडणीची गोष्ट.

अटावाल्पा ८०००० हजाराची फौज असल्याने शक्तीशाली समजला जात होता तर पझारो फक्त १६८ सैनिक असल्याने ही लढाई सहज हारेल असे वाटले होते. परंतु पझारोनं हिंमत दाखवत ८० हजाराच्या फौजेसमोर अटावाल्पाला कैद केले. त्यानंतर पझारोने अटावाल्पाला आठ महिने कैदेत ठेवले. त्यानंतर इंका साम्राज्याकडून अटावाल्पाला सोडण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. पझारोनं अटावाल्पाला सोडण्याचं आश्वासन देत इतिहासातील सर्वात मोठी खंडणी मागितली. खंडणीमध्ये मागितलेलं सोनं एवढं होतं की त्याने २२ फुट लांब, १७ फुट रुंद आणि ८ फुट उंच एवढी मोठी खोली भरली होती. एवढी खंडणी मिळाल्यानंतर पझारो अटावाल्पाला सोडेल असे वाटले होते परंतु त्याने शब्द फिरवला आणि त्याला ठार केले.

अटावाल्पाच्या हत्येनंतर स्पॅनिश लोकांनी युरोपात आपले भक्कम स्थान निर्माण केले. अटावाल्पाची लोक 'सुर्यदेव' म्हणून पुजा करत होते. त्याच्या हत्येनंतर पझारोने सबंध इंका साम्राज्यावर आपली माणसे पाठवली आणि संपर्ण प्रदेश आपल्या अधिपत्याखाली घेतला. त्यानंतर पनामावरुन अधिकची कुमक मागवून पझारोने इंका साम्राजाच्या शेवट केला. अशा तर्हेने अटावाल्पाची अटक हा आधुनीक इतिहासातील सर्वात मोठा क्षण मानला जातो.

Reference Book : Guns, Germs and Steel (Gered Diamond)

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in