Crime : काळीज पिळवटून टाकणारी घटना! नवऱ्यासोबत भांडण अन् आईने 3 मुलांनाच संपवलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Woman jumped into the well with four children, got scared and came out after saving one, painful death of three
Woman jumped into the well with four children, got scared and came out after saving one, painful death of three
social share
google news

Crime News :

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बुरहानपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. कौटुंबिक वादातून काल (रविवारी) एका महिलेने 4 मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रमिला भिलाला (30) असं या महिलेचे नाव आहे. या घटनेत महिलेच्या 3 निष्पाप मुलांचा मृत्यू झाला आहे, तर महिला आणि तिची एक मुलगी बचावली आहे. (Woman jumped into the well with four children, got scared and came out after saving one, painful death of three)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुरहानपूर जिल्हा मुख्यालयापासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या बालदी गावात घडली आहे. प्रमिला भिलाला यांना 18 महिन्यांचा मुलगा, 3 वर्षांची मुलगी, 5 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांच्या मुलगी आहे. रविवारी प्रमिलाचे पती रमेशसोबत भांडण झाले. त्यानंतर तिने मुलांसह आत्महत्या करण्याचा विचार सुरु केला. तिने घराजवळच असलेल्या विहीरीवर जात चारही मुलांसह विहीरीत उडी मारली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : Palghar: बॉयफ्रेंडला झाडाला बांधलं अन् गर्लफ्रेंडवर केला गँगरेप

मात्र विहिरीत उडी मारताच प्रमिलाला भीती वाटू लागली आणि तिने बाहेर येण्याचा प्रयत्न सुरू केला. यादरम्यान तिने मोठ्या मुलीसह विहिरीत लटकलेली दोरी पकडली आणि बाहेर आली. सध्या प्रमिला आणि तिच्या सात वर्षांच्या मुलीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र इतर तिघांना वाचविण्यात ती अयशस्वी ठरली. त्यामुळे या घटनेत 3 मुलांचा मृत्यू झाला आहे. यात 18 महिन्यांचा मुलगा, 3 वर्षांची मुलगी आणि 5 वर्षांची मुलगी यांचा समावेश आहे. पोलिसांनी 3 मुलांचे मृतदेह काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

हेही वाचा : WhatsApp वर एक मेसेज अन् मुलगी दारात हजर… ठाण्यात सेक्स रॅकेट उद्ध्वस्त

दरम्यान, पोलीस राहुल कुमार यांनी सांगितले की, प्रमिला यांच्या घराजवळ असलेल्या विहिरीतून तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस संबंधित महिलेच्या कुटुंबाची पार्श्वभूमीही तपासत आहेत. काही दिवसांपूर्वी बुरहानपूर जिल्ह्यातील नेपानगर तालुक्यातील दावली खुर्द गावात एकाच कुटुंबातील 5 जणांनी आत्महत्या केली होती. यात एका घरात पती-पत्नीसह 3 अल्पवयीन मुलींचे मृतदेह आढळून आले होते. सर्व मृत मुले 10 वर्षांपेक्षा कमी वयाची होती. पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ADVERTISEMENT

हेही वाचा : कामावर पोहोचण्यास उशीर…, ट्रॅफिक पोलिसाची होमगार्डलाच कानशिलात

    follow whatsapp

    ADVERTISEMENT