WhatsApp वर एक मेसेज अन् मुलगी दारात हजर… ठाण्यात सेक्स रॅकेट उद्ध्वस्त

मुंबई तक

एक महिला सुरक्षा रक्षक व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हे सेक्स रॅकेट चालवत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत महिलेला अटक केली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

sex racket news thane :

ठाणे : येथे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका महिला सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला मुंब्रा रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली आहे. मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक महेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना एक महिला सुरक्षा रक्षक व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हे सेक्स रॅकेट चालवत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत महिलेला अटक केली. (Thane Police has arrested a female security guard who was running a sex racket through WhatsApp)

चौकशीत असे आढळून आले की, ही महिला व्हॉट्सअॅपद्वारे मुली आणि ग्राहकांशी संपर्क करत असे. त्यानंतर ग्राहकाने सांगितलेल्या ठिकाणी मुलींना पाठवत असे. सध्या अटक केलेल्या महिलेची चौकशी सुरू आहे. या महिलेविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत भरदिवसा तीन जणांचा खून, 54 वर्षीय व्यक्तीने शेजाऱ्यांना संपवलं!

यापूर्वीही झाल्या आहेत कारवाया :

ठाण्यात यापूर्वीही सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात एका घरावर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून दोन अभिनेत्री, दोन महिला दलाल आणि एका पुरूष दलालासह पाच जणांना अटक केली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp