Uddhav Thackeray : शिंदेंचे 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात, भूकंप होणार?
Maharashtra Lok Sabha : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय हादरे जाणवण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अजित पवारांचे आमदार संपर्कात असल्याची माहिती दिल्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेचे आमदारही ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात?

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भूकंप होणार?

राजकीय वर्तुळात पुन्हा पक्षांतराची चर्चा
Uddhav Thackeray Shiv Sena : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात नवा राजकीय खेळ सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबर धक्का बसला असून, महाविकास आघाडीने लक्ष वेधून घेणारी कामगिरी केली आहे. यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची कामगिरीही चांगली झाली असून, ठाकरेंना सोडून गेलेल्या आमदार पुन्हा परतण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर आली आहे. (6 mlas of Shiv Sena led by Eknath shinde willing to joined uddhav Thackeray's shiv sena)
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडली. लोकसभा निवडणूक निकालात या फुटीचेही परिणाम दिसून आले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दहा पैकी ८ जागा जिंकल्या, तर ठाकरेंच्या शिवसेने २१ पैकी ९ जागा जिंकल्या. सत्ताधारी महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीने कामगिरी जबरदस्त कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिंदेंचे 5 ते 6 आमदार घरवापसी करणार?
या निकालानंतर एकनाथ शिंदेंच्या सोबत गेलेल्या आमदारांमध्ये चलबिचल असल्याचे राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात बोलले जात आहे. त्यातच आता शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे)एका मोठ्या नेत्यांने दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ५ ते ६ आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत.