Amit Shah: '...म्हणून ठाकरे आणि पवारांचे पक्ष फुटले', शाह नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

 पुत्र प्रेमामुळेच त्यांच्या पक्षात फूट पडली, अमित शाहांचा मोठा दावा
पुत्र प्रेमामुळेच त्यांच्या पक्षात फूट पडली, अमित शाहांचा मोठा दावा
social share
google news

Amit Shah Statment on Shiv sena and NCP: नवी दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी 19 एप्रिल रोजी इंडिया टुडेला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांच्या फुटीबाबत एक मोठं विधान केलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जी फूट झाली त्याचा आरोप भाजपवर करण्यात येतो त्यालाच अमित शाह यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. (amit shah exclusive interview bjp is not responsible for breaking party of shiv sena and ncp his love for his childern caused a split said shah)

इंडिया टुडेचे वृत्त संचालक आणि वरिष्ठ संपादक राहुल कनवाल यांना दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत अमित शाह यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस का फुटली याबाबत त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

'आपल्या मुलाच्या जागी उद्धवजी यांनी एकनाथजींना पसंत केलं असतं तर पक्ष फुटला असता का? मुलीच्या ऐवजी अजित पवारांना पसंती दिली असती तर पक्ष फुटला असता का? आपल्या मुला-मुलींमुळे तर त्यांनी आपले पक्ष हातातून गमावले आहेत आणि आरोप आमच्यावर करत आहेत. ज्याचा अधिकार होता त्याला ते देऊन टाकायला हवं होतं.' असं म्हणत अमित शाह यांनी ठाकरे-पवारांवर यावेळी निशाणा साधला आहे. 

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीबाबत अमित शाह नेमकं काय म्हणाले?

प्रश्न: शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांचा.. जो मूळ पक्ष होता त्यांना काही प्रमाणात सहानुभूती होतीय अशावेळी महाराष्ट्र हा सध्याच्या घडीला अत्यंत बुचकळ्यात टाकणारं राज्य आहे का? निवडणुकीच्या दृष्टीने.. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अमित शाह: हे बघा आपण देशाला राज्या-राज्यात विभागून पाहू नका. देशाच्या जनतेने घराणेशाहीला नाकारलं आहे.. तुम्ही माझं म्हणणं माना.. देशातील तरुणांना त्यांची जागा हवी आहे राजकारणात.. 

जन्म घेणं हे कोणा व्यक्तीच्या हातात नसतं.. कौशल्य वाढवणं, शिक्षण घेणं.. अभ्यास करणं, निर्णय घेणं आणि पुरुषार्थ करणं हे माणसाच्या हातात असतं.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> 'जे बाळासाहेबांनी दिलं ते मीही..', पवारांची खणखणीत मुलाखत

जन्म हे ईश्वर ठरवतो, नियती ठरवते.. पण याच्या आधारावर जर माणसाला मोठं किंवा छोटं ठरवलं जात असेल तर ती व्यवस्था लोकशाहीला धरून नाही. देशाच्या जनतेने ही गोष्ट नाकारली आहे. 

ADVERTISEMENT

आमच्यावर आरोप केला जातो की, आम्ही त्यांचा पक्ष फोडला. मला एक गोष्ट सांगा.. आपल्या मुलाच्या जागी उद्धवजी यांनी एकनाथजींना पसंत केलं असतं तर पक्ष फुटला असता का? 

मुलीच्या ऐवजी अजित पवारांना पसंती दिली असती तर पक्ष फुटला असता का? आपल्या मुला-मुलींमुळे तर त्यांनी आपले पक्ष हातातून गमावले आहेत आणि आरोप आमच्यावर करत आहेत. ज्याचा अधिकार होता त्याला ते देऊन टाकायला हवं होतं.

हे ही वाचा>> सिंचन घोटाळ्याची केस, शाहांच्या 'त्या' विधानाने मोठी खळबळ!

असं विधान करत अमित शाह यांनी दावा केला आहे की, पुत्र प्रेमामुळे या दोन्ही पक्षात फूट पडली आहे. त्याला भाजप जबाबदार नाही. आता अमित शाह यांच्या या आरोपाला ठाकरे आणि पवार कशा पद्धतीने उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT