Baramati Lok Sabha Elections 2024 : अजित पवार खरंच सुप्रिया सुळेंविरोधातील उमेदवार बदलणार?
Ajit Pawar Mahadev Jankar Supriya Sule : बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार महादेव जानकरांना उमेदवारी देऊ शकतात का?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारच असतील उमेदवार
महादेव जानकरांऐवजी सुनेत्रा पवार कशा वरचढ?
सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशीच होणार लढत
Baramati Lok Sabha Elections 2024, Supriya Sule vs Sunetra Pawar : महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीमध्येच राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. पण, त्यानंतर ही चर्चा सुरू झाली की, सुप्रिया सुळेंविरोधात महादेव जानकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. खरंच सुनेत्रा पवारांना बाजूला करून जानकर निवडणूक लढवू शकतात का? याबद्दलच जाणून घेऊयात. (mahadev jankar will contest against supriya sule instead of sunetra pawar, is it possible?)
सुप्रिया सुळेंविरोधात खऱंच महादेव जानकर उमेदवार असू शकतात का? याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय आहे, ते पहा...
बारामती लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे, नेमकी काय भूमिका आहे? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, "आमच्यावर प्रेम करणारी जी काही मंडळी आहे; ज्यांना सुनेत्रा पवार उमेदवार असल्यामुळे भय वाटतं, अशीच मंडळी अशा पद्धतीचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत."
"महादेव जानकर हे महायुतीमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांना लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय मुंबईतील बैठकीत झालेला आहे. कुठला मतदारसंघ त्यांना देण्यात येईल, याची घोषणाही दोन-तीन दिवसांत होईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीत उमेदवारांची घोषणा कधी करायची, यासंदर्भातही मी अजित पवारांसोबत चर्चा करणार आहे."










