Nashik Lok Sabha Election : "अमित शाह शिंदेंना म्हणाले, नाशिकमधून भुजबळच लढतील"
Nashik Lok Sabha Election, Chhagan bhujbal : नाशिक लोकसभा मतदारसंघातून लढवण्यास भुजबळ यांचा नकार.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
नाशिक लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४
Chhagan Bhujbal, Nashik Lok Sabha Election 2024 : महायुतीत नाशिकच्या जागेवरून तिढा निर्माण झाला आहे. या जागेवरून छगन भुजबळ निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू असतानाच भुजबळांनी आज मोठी घोषणा केली. अमित शाह यांनी आपले नाव सूचवले होते. पण, हा तिढा सुटत नसल्याने मी लोकसभा निवडणूक लढवण्यातून माघार घेत आहे, असे भुजबळ यांनी सांगितले. (Chhagan Bhujbal withdraw his nomination from Nashik Lok Sabha)
ADVERTISEMENT
महायुतीचे जागावाटप अजूनही निश्चित झालेले नाही. काही जागांवरून तिढा असून, त्यातील दोन जागांची घोषणा झाली आहे. त्यापाठोपाठ आता नाशिकच्या जागेचाही तिढा सुटण्याच्या दृष्टीने हालचाली झाल्या आहेत.
नाशिक जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. अमित शाह यांनी छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याची सूचना केली होती. त्यामुळे हेमंत गोडसेंचा पत्ता कट होणार असेच मानले जात होते. पण, आता भुजबळांनी माघार घेतली आहे.
हे वाचलं का?
माघार घेण्याचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी भुजबळांनी काय सांगितलं?
भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, "होळीच्या दिवशी आम्हाला अजितदादांचा निरोप आला. त्यामुळे आम्ही देवगिरीवर गेलो. तिथे अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे बसलेले होते. 1 वाजता बोलवलं. मी म्हणालो कशाला बोलावलं. ते म्हणाले, 'आजच आम्ही ६ वाजता दिल्लीवरून आलो. दिल्लीला अमित शाह यांच्याबरोबर मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवार ही सगळी मंडळी जागावाटपाच्या चर्चेला बसलो होतो. त्यावेळी नाशिकच्या जागेची चर्चा झाली. अजित पवारांनी सांगितलं की, आमचे आमदार आहेत. ती जागा आम्हाला द्यावी."
हेही वाचा >> 'माझी बदनामी नको असेल, तर...'; चव्हाणांची भावनिक साद
"त्यांनी (अमित शाह) विचारलं की, कोण आहेत तुमचे उमेदवार? तर यांनी (अजित पवार) माजी खासदार समीर भुजबळ. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, तिथे छगन भुजबळ उभे राहतील. मग शिंदे म्हणाले की, ती आमची जागा आहे आणि गोडसे तिथे खासदार आहेत. ते म्हणाले आम्ही त्यांना समजावू, पण भुजबळ तिथे लढतील", अशी इनसाईड स्टोरी भुजबळ यांनी सांगितली.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> आंबेडकरांनी उदयनराजेंविरोधात उतरवला 'वंचित'चा उमेदवार
भुजबळ पुढे म्हणाले की, "मी त्यांना (अजित पवार) म्हणालो, थोडा वेळ द्या. उद्या येऊन सांगतो. दुसऱ्या दिवशी गेलो, म्हटलं काय? ते म्हणाले, दुसरा मार्ग नाही. तुम्हाला लढावं लागेल. मग नाशिकला जाऊन चाचपणी सुरू केली. सुदैवाने चांगला प्रतिसाद मिळाला."
ADVERTISEMENT
"नंतर ती बातमी फुटली आणि भुजबळ निवडणूक लढवणार चर्चा सुरू झाली. त्यानंतर मला तुम्हाला सांगावं लागलं. पण, जागा जाहीर करताना आणि उमेदवार जाहीर करताना वेळ लागू लागला", असे सांगत भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT