Maharashtra Lok Sabha : उद्धव ठाकरे 'या' 14 जागा जिंकणार?

मुंबई तक

Maharashtra Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघापैकी 21 मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार रिंगणात आहेत. या 21 पैकी कोणत्या मतदारसंघात ठाकरेंचे उमेदवार जिंकू शकतात, पहा महाराष्ट्रातील संस्थेचा एक्झिट पोल काय सांगतोय?

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळणार?
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तब्बल १४ जागा मिळण्याचा अंदाज महाराष्ट्रातील संस्थेने वर्तवला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक २०२४

point

उद्धव ठाकरे यांची शिवसेनेला किती जागा जिंकणार?

point

ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल एक्झिट पोल काय म्हणतो?

Maharashtra Lok Sabha 2024 Exit Poll : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन्ही गट निवडणुकीत आमने-सामने आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची कामगिरी कशी असेल आणि महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा लढवत असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा मिळणार, याची उत्सुकता आहे. याबद्दल रुद्रा रिसर्च अ‍ॅण्ड अनॅलिटीक्सचा एक्झिट पोलने काही अंदाज मांडले आहेत. यात ठाकरेंच्या शिवसेनेला 14 जागा मिळणार असे म्हटले आहे. (exit poll prediction says that Uddhav Thackeray's shiv sena will be won 14 seats in lok sabha election 2024)

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने यावेळी लोकसभेच्या 21 जागा लढवल्या आहेत. त्यातील बहुतांश जागांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत ठाकरेंच्या उमेदवारांची लढत होत आहे. त्यामुळे या जागांवर काय निकाल लागणार, याबद्दल सगळ्यांना उत्कंठा वाढली आहे.

Lok Sabha 2024 : महाराष्ट्रातील संस्थेचा एक्झिट पोल काय सांगतोय? 

दरम्यान, 'रुद्रा रिसर्च अ‍ॅण्ड अनॅलिटीक्स' या संस्थेने एक्झिट पोल प्रसिद्ध केला आहे. यात ठाकरेंची शिवसेना 14 जागा जिंकणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार किती मताधिक्याने विजयी होणार, याबद्दलही अंदाज मांडलेला आहे.

हेही वाचा >> सांगली, बारामती कुणाचा 'गेम'? पहा एक्झिट पोल

उद्धव ठाकरेंची शिवसेना किती जागा जिंकणार? पहा एक्झिट पोल
उमदेवार मतदारसंघ विरोधी उमेदवार विजयाचे मताधिक्य
संजय दिना पाटील उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मिहीर कोटेचा (भाजप) 60,000-90,000
अमोल कीर्तिकर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा रवींद्र वायकर (शिवसेना) 50,000-70,000
अरविंद सावंत दक्षिण मुंबई लोकसभा यामिनी जाधव (शिवसेना) 50,000-70,000
अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबई लोकसभा राहुल शेवाळे (शिवसेना) 10,000-20,000
राजन विचारे ठाणे लोकसभा नरेश म्हस्के (शिवसेना) 40,000-60,000
सत्यजीत पाटील हातकणंगले लोकसभा धैर्यशील माने (शिवसेना) 80,000-1,00,000
राजाभाऊ वाजे नाशिक लोकसभा हेमंत गोडसे (शिवसेना) 2,40,000-2,70,000
भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी लोकसभा सदाशिव लोखंडे (शिवसेना) 25,000-50,000
चंद्रकांत खैरे औरंगाबाद लोकसभा संदीपान भुमरे (शिवसेना) 10,000-20,000
ओमराजे निंबाळकर उस्मानाबाद लोकसभा अर्चना पाटील (राष्ट्रवादी) 3,50,000-4,00,000
संजय जाधव परभणी लोकसभा महादेव जानकर (रासप) 1,00,000-1,30,000
नागेश पाटील आष्टीकर हिंगोली लोकसभा बाबुराव कदम (शिवसेना) 1,30,000-1,60,000
नरेंद्र खेडेकर बुलढाणा लोकसभा प्रताप जाधव (शिवसेना) 25,000-5,0000
संजय देशमुख यवतमाळ-वाशिम लोकसभा राजश्री पाटील (शिवसेना) 90,000-1,20,000

 

हे वाचलं का?

    follow whatsapp