India Today-Axis My Exit Poll: BJP जिंकणार महाराष्ट्रात 'या' जागा?, यादी एका क्लिकवर
India Today-Axis My Exit Poll: 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपने सलग 23 जागा जिंकण्याचा विक्रम महाराष्ट्रात केला होता. यंदाच्या निवडणुकीत भाजप हा विक्रम मोडेल असा अंदाज होता. मात्र भाजपला यावेळेस 20 ते 22 जागा जिंकता येतील असा अंदाज इंडिया टूडे अॅक्सिस माय एक्झिट पोलने वर्तवला आहे.
ADVERTISEMENT

India Today-Axis My Exit Poll Maharashtra BJP : लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल समोर आला आहे.या एक्झिट पोलमध्ये लोकसभेच्या 48 जागा असलेल्या महाराष्ट्राचा निकाल काय लागणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजपने मागील अडीच वर्षात ज्या आक्रमकपणे महाराष्ट्रात राजकारण केलं आहे त्यामुळे त्यांचे विरोधक हे अत्यंत ताकदीने एकत्र आले आहेत. एकीकडे भाजपने महायुतीच्या साथीने महाराष्ट्र काबीज करण्याची रनणिती आखलेली असताना दुसरीकडे महाविकास आघाडी देखील तेवढ्याच ईर्षेने निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. पण असं असलं तरी यंदाच्या निवडणुकीतही भाजप 22 जागा जिंकणार असल्याचा अंदाज इंडिया टूडे अॅक्सिस माय एक्झिट पोलमध्ये वर्तवला आहे. (india today axis my india maharashtra exit poll bjp won these seats in maharashtra full list of exit poll prediction lok sabha election 2024)
2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपने सलग 23 जागा जिंकण्याचा विक्रम महाराष्ट्रात केला होता. यंदाच्या निवडणुकीत भाजप हा विक्रम मोडेल असा अंदाज होता. मात्र भाजपला यावेळेस 20 ते 22 जागा जिंकता येतील असा अंदाज इंडिया टूडे अॅक्सिस माय एक्झिट पोलने वर्तवला आहे.
हे ही वाचा : फडणवीस-पवारांची प्रतिष्ठा पणाला, माढ्यात कोण उधळतंय गुलाल?
मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपची शिवसेनेची युती होती. ज्याचा थेट फायदा त्यांना त्यावेळी झाला होता. मात्र, आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेली फूट या गोष्टींचा नेमका भाजपला फायदा होणार की तोटा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण एक्झिट पोलनुसार, यंदाच्या निवडणुकीत भाजप महाराष्ट्रात तब्बल 22 जागा जिंकू शकतात. ज्या मागील निवडणुकींमधील जागांपेक्षा एक जागा कमी आहे.
इंडिया टूडे अॅक्सिस माय एक्झिट पोलमध्ये 48 मतदारसंघात नेमकं कोण जागा जिंकणार याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इंडिया टूडे अॅक्सिस माय एक्झिट पोलनुसार, महायुतीला राज्यात 48 पैकी तब्बल 28 ते 32 जागा मिळू शकतील, यामध्ये राज्यात 48 पैकी 20 ते 22 जागा या भाजपला मिळतील. शिवसेना (शिंदे गट) 8 ते 10 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला 1 ते 2 जागांवर उमेदवार विजयी होऊ शकतात.