अजितदादा नॉटरिचेबल भुजबळ नाराज, तटकरे-पवार भेटीच्या चर्चा; राष्ट्रवादीत काय सुरु?

राहुल गायकवाड

NCP: बारामतीच्या निवडणुकीनंतर अजित पवार हे जवळजवळ नॉट रिचेबल झाले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अनेक घडामोडी घडत आहेत.

ADVERTISEMENT

अजित पवारांना एकत्र घेण्याबाबत शरद पवार काय म्हणाले?
अजित पवारांना एकत्र घेण्याबाबत शरद पवार काय म्हणाले?
social share
google news

मुंबई: राष्ट्रवादीत नेमकं काय सुरु आहे असा प्रश्न 2019 पासून सातत्याने महाराष्ट्रातील जनतेला पडत आला आहे. महाराष्ट्रातील निवडणुका संपत येत असतानाच आता राष्ट्रवादीत काय सुरु आहे असा प्रश्न विचारला जातोय. त्याला गेल्या काही दिवसांमधील घडामोडींचा आधार दिला जातो आहे. अजित पवारांचं नॉटरिचेबल असणं, भुजबळांनी जाहीर नाराजी व्यक्त करणं आणि सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या भेटीच्या चर्चा रंगणं, यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? याच्या चर्चा आहेत. त्यामुळे नेमकं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय सुरु आहे, हेच आपण  समजावून घेऊयात. (lok sabha election 2024 ajit pawar not reachable chhagan bhujbal angry sunil tatkare sharad pawar meeting discussed in political circles what is really going on in ncp congress)

बारामतीची निवडणूक पार पडल्यानंतर अजित पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत अजितदादांनी चंद्रकांत पाटलांनी पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. बारामतीमधून पवारांचं राजकारण संपवायचं आहे असं चंद्रकांत पाटील एका पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले होते. या वक्तव्याचा पवार गटाच्या नेत्यांकडून समाचार घेण्यात आला.

हे ही वाचा>> PM Modi : पत्रकार परिषद घेत नाही कारण...; अखेर मोदींनी दिलं उत्तर

अजित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटलांवर नाराजी व्यक्त केलेली. चंद्रकांत पाटलांनी असं वक्तव्य करायला नको होतं असं अजित पवार यांनी म्हटलं, त्याचबरोबर या वक्तव्यानंतर तुम्ही बारामतीमध्ये प्रचारासाठी येऊ नका असं देखील पाटलांना सांगितल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलेलं. याच पत्रकार परिषदेमध्ये अजितदादांनी पवारांबाबत सहानभुती देखील दाखवली होती. पवारांना या वयात सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी सभा घ्यायला लावू नये असं देखील दादा म्हणाले होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं घडतंय काय?

आता अजित पवारांनी एक प्रकारे शरद पवारांविषयी मवाळ भूमिका घेतल्याचं दिसून आलं. शिरुरची निवडणूक पार पडल्यानंतर अजित पवार कुठल्याही जाहीर कार्यक्रमांमध्ये दिसून आले नाहीत. पाचव्या टप्प्यामध्ये मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील जागांच्या निवडणुका आहेत. या जागांच्या प्रचारासाठी महायुतीकडून ठिकठिकाणी प्रचारसभा घेण्यात आल्या. दिंडोरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. या सभेला अजित पवारांनी दांडी मारली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp