Lok Sabha : ठाकरेंच्या परदेशवारीवर CM शिंदेंचा सणसणीत टोला, 'आपला गाव बरा गड्या...'
Eknath shinde criticize Udhhav Thackeray : शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे लोकसभेचे निवडणूक संपल्यानंतर परदेश दौऱ्यावर गेले आहेत. याच परदेश दौऱ्यावर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी एक्सवर पोस्ट लिहली आहे.
ADVERTISEMENT
Eknath shinde criticize Udhhav Thackeray : महाराष्ट्रातील लोकसभेचं मतदान यशस्वीरीत्या पार पडलं आहे आणि आता फक्त निकालाची प्रतिक्षा लागली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे या मूळ गावी गेले आहेत.यावेळी गावातील शेत शिवारात फेर फटका मारतानाचा एक व्हिडिओ त्यांनी एक्सवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यामातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.
(lok sabha election 2024 cm eknath shinde criticize udhhav thackeray on abroad tour maharashtra lok sabha result)
ADVERTISEMENT
शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे लोकसभेचे निवडणूक संपल्यानंतर परदेश दौऱ्यावर गेले आहेत. याच परदेश दौऱ्यावर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी एक्सवर पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये शिंदे म्हणतात, परदेशी कशाला जायाचं गड्या, आपला गाव बरा..., शेत पिकाची दुनिया न्यारी, वसे जिथे विठूरायाची पंढरी..., अशी ओळ लिहून मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.
हे ही वाचा : Exit Poll 2024 : महाराष्ट्रातील एक्झिट पोल कुठे आणि कधी पाहता येणार?
मुख्यमंत्री शिंदे यांची पोस्ट जशीच्या तशी...
परदेशी कशाला जायाचं
गड्या आपला गाव बरा
शेत पिकाची दुनिया न्यारी
वसे जिथे विठूरायाची पंढरी...
हे वाचलं का?
लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला.
यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला जीव देणाऱ्या गाई गुरांची चौकशी करून त्यांना प्रेमाने दोन घास खाऊ घातले. तसेच शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली. इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच पण पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी आव्हाने सर करण्याचे बळही देते.
ADVERTISEMENT
दरम्यान महाराष्ट्रात 48 जागांसाठी लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात पार पडली आहे. या निवडणुकीसाठीचे मतदान पार पडल्यानंतर अनेक नेत्यांनी थोडा ब्रेक घेतला आहे. त्यानंतर आता निकालाच्या वेळेस हे नेते पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Pune Accident: पोराच्या रक्तात दारू सापडू नये म्हणून आईने दिलं ब्लड सॅम्पल!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT