Uddhav Thackeray: 'बंडखोरी, गद्दारी होत असेल तर...', 'त्या' जागेवरून ठाकरे कोणावर भडकले?
Sangli Lok Sabha Election Vishal Patil: महाविकास आघाडीत सांगलीची जागा हा शिवसेना (UBT) कडे गेली असली तरी त्यावरून काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं दिसून येत आहे. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत.
ADVERTISEMENT
Sangli Lok Sabha Election Uddhav Thackeray: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) साठी भाजप आणि एनडीएला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी ही एकत्र आली आहे. मात्र, सांगलीच्या जागेवरून सुरू झालेला वाद हा अद्यापही शमलेला नाही. त्यामुळेच शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या (16 एप्रिल) पत्रकार परिषदेत एकप्रकारे आपला संताप व्यक्त करत थेट काँग्रेसलाचा सुनावलं आहे. (lok sabha election 2024 if rebellion betrayal is happening that party should stop it uddhav thackeray lashed out at congress on sangli seat)
ADVERTISEMENT
कोल्हापूरची जागा शिवसेनेने काँग्रेसला सोडल्याने सांगलीची जागा आपल्याला मिळावी असा आग्रह ठाकरेंनी धरला होता. त्यानुसार जागावाटपात ती जागा ठाकरेंना मिळाली देखील. मात्र, तेथील काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम हे विशाल पाटील यांनाच तिकीट मिळावं यासाठी आग्रही होते. त्यासाठी त्यांनी अनेकदा दिल्लीवारी देखील केली. पण त्यांच्या पदरी निराशा आली.
हे ही वाचा>> भाजपने साताऱ्याचा सस्पेन्स संपवला, उमेदवार केला जाहीर
असं असताना काल (15 एप्रिल) विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. एक अर्ज त्यांनी अपक्ष म्हणून दाखल केला तर दुसरा अर्ज हा काँग्रेस पक्षाचा नावाने भरला आहे. विशाल पाटील यांनी यावेळी असा विश्वासही व्यक्त केला की, 19 एप्रिलपर्यंत काँग्रेस त्यांना एबी फॉर्म देईल आणि त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळेल.
हे वाचलं का?
दरम्यान, याच गोष्टीवरुन उद्धव ठाकरे हे मात्र संतापलेले दिसून आले. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना विशाल पाटलांच्या उमेदवारी अर्जावरून जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी एक प्रकारे काँग्रेसलाच इशारा दिला. 'आता जर कुठे बंडखोरी किंवा गद्दारी होत असेल तर त्या-त्या पक्षाची जबाबदारी आहे. ते त्यांनी थांबवलं पाहिजे.' असं उद्धव ठाकरेंनी सांगलीच्या जागेबाबत म्हटलं आहे.
विशाल पाटलांचा उमेदवारी अर्ज, उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
विशाल पाटील यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला त्याबाबत जेव्हा उद्धव ठाकरेंना सवाल विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, 'असं काही नाही.. संपूर्ण देशात हुकूमशाहीविरोधात एक जनमत तयार झालं आहे. जे मतदानाची वाट बघतंय. त्यामुळे मी आज त्याबद्दल काही बोलणार नाही.'
ADVERTISEMENT
'जागावाटप हा झालेला आहे. तीनही पक्षांनी आणि महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर केलं आहे. आता जर कुठे बंडखोरी किंवा गद्दारी होत असेल तर त्या-त्या पक्षाची जबाबदारी आहे. ते त्यांनी थांबवलं पाहिजे. पण बंडखोरी झाली तरी जनता काही त्यांना स्थान देईल.' असं विधान त्यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> मविआमध्ये पहिलं बंड! ठाकरेंची वाढली कटकट, भाजपला होणार फायदा?
ठाकरेंच्या शिवसेनेने सांगलीतून चंद्रहार पाटील यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे नाराज झालेले काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. ज्यामुळे महाविकास आघाडीत काहीसा तणाव निर्माण झाला आहे. मात्र, आता काँग्रेस पक्ष यावर नेमका काय तोडगा काढतं, विशाल पाटील यांना माघार घेण्यास भाग पाडतं का? याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT