Satara Lok Sabha : भाजपने साताऱ्याचा सस्पेन्स संपवला, उमेदवार केला जाहीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उदयनराजे भोसले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उदयनराजे भोसले.
social share
google news

Satara Lok Sabha election 2024, udayanraje bhosale : सातारा लोकसभा मतदारसंघात कोणत्या दोन उमेदवारांमध्ये लढत होणार, याचे चित्र आज (१६ एप्रिल) स्पष्ट झाले आहे. भाजपने अखेर उमेदवारीबद्दलचा सस्पेन्स संपवला आहे. साताऱ्यातून उमेदवार घोषित केला आहे. उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (BJP Announces Nomination of udayanraje bhosale from Satara lok Sabha)

सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी उदयनराजे भोसले सुरूवातीपासून प्रयत्न करत होते. गेल्या महिन्यात त्यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांचीही भेट घेतली होती. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आहे.

राष्ट्रवादी की भाजप फसला होता पेच?

सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी अजित पवार गटाची मागणी होती. पण, उदयनराजे भोसले यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर उदयनराजे भोसले कमळ चिन्हावरच निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले

सातारा लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे साताऱ्यात शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले अशी लढत होणार, स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा >> मविआमध्ये पहिलं बंड! ठाकरेंची वाढली कटकट, भाजपला होणार फायदा? 

श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतल्यानंतर शरद पवारांसमोर काही नावे आली होती. उदयनराजे उमेदवार असल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही शरद पवारांनी प्रस्ताव दिला होता. पण, घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार नाही, अशी अट चव्हाणांनी घातली होती. त्यनंतर शशिकांत शिंदेंना उमेदवारी देण्यात आली.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> देवेंद्र फडणवीसांनी दिली आमदारकीची ऑफर? 

BJP announced Udayanraje Bhosale name as lok Sabha Candidate.
भाजपने उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी सोडली अन् पराभव झाला

उदयनराजे भोसले हे 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणून आले होते. पण, त्यांनी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक झाली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबरोबर झालेल्या या लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे यांना पराभवाचा सामना करावा लागला. उदयनराजे यांना भाजपने राज्यसभेवर पाठवले. राज्यसभा खासदार असतानाच आता उदयनराजे भोसले पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT