केंद्रावर जाण्यापूर्वीचं महिलेच्या नावाचं मतदान झालं, दबाव टाकताच पोस्टल करुन घेतलं; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune Mahanagar Palika Election 2026 : मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला मतदानासाठी ठरलेल्या वेळेत कटारिया हायस्कूल येथील मतदान केंद्रावर पोहोचली असता, मतदार यादी तपासणीदरम्यान तिच्या नावासमोर ‘मतदान झाले आहे’ अशी नोंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे महिला चक्रावून गेली. आपण अद्याप मतदान केलेले नाही, असे तिने ठामपणे सांगितले असतानाही मतदान यंत्रणेकडून आधीच मतदान झाल्याचे सांगण्यात आले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
केंद्रावर जाण्यापूर्वीचं महिलेच्या नावाचं मतदान झालं
दबाव टाकताच पोस्टल करुन घेतलं
पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune Mahanagar Palika Election 2026 : पुणे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. मतदान केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच एका महिलेच्या नावावर आधीच मतदान झाल्याची बाब उघडकीस आली असून, त्यानंतर संबंधित महिलेने बेधडक सवाल केले. यानंतर तिच्याकडून पोस्टल मतदान करून घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील प्रभाग क्रमांक 21 मधील कटारिया हायस्कूल येथील मतदान केंद्रावर घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला मतदानासाठी ठरलेल्या वेळेत कटारिया हायस्कूल येथील मतदान केंद्रावर पोहोचली असता, मतदार यादी तपासणीदरम्यान तिच्या नावासमोर ‘मतदान झाले आहे’ अशी नोंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे महिला चक्रावून गेली. आपण अद्याप मतदान केलेले नाही, असे तिने ठामपणे सांगितले असतानाही मतदान यंत्रणेकडून आधीच मतदान झाल्याचे सांगण्यात आले.
या प्रकाराबाबत महिलेने आक्षेप नोंदवताच, संबंधित अधिकाऱ्यांनी तिला पोस्टल मतदानाचा पर्याय देत त्याच मार्गाने मतदान करून घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुणे महानगरपालिका निवडणुकीतील मतदान प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे, हा प्रकार केवळ एका प्रभागापुरता मर्यादित नसून, पुण्यातील किमान दोन प्रभागांमध्ये बोगस मतदान झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळे निवडणूक व्यवस्थेतील त्रुटी आणि संभाव्य गैरप्रकारांबाबत चर्चा सुरू झाली आहे.










