Lok Sabha Election 2024: कल्याणचा उमेदवार थेट देवेंद्र फडणवीसांनीच केला जाहीर, 'या' नेत्याच्या नावाची घोषणा

योगेश पांडे

ADVERTISEMENT

कल्याणचा उमेदवार थेट देवेंद्र फडणवीसांनीच केला जाहीर
कल्याणचा उमेदवार थेट देवेंद्र फडणवीसांनीच केला जाहीर
social share
google news

Kalyan Lok Sabha constituency Devendra Fadnavis: नागपूर: लोकसभा निवडणूक 2024 ( Lok Sabha Election 2024) साठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून आता जवळजवळ सर्व जागांवरील उमेदवार हे घोषित करण्यात आले आहेत. मात्र, काही जागा अशा आहेत की, ज्यावरून अद्यापही रस्सीखेच सुरू आहे. असाच मतदारसंघ म्हणजे कल्याण. या मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे सलग दोनदा खासदार म्हणून निवडून गेले आहेत. मात्र, अद्यापही शिवसेनेकडून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा काही करण्यात आली नाही. असं असताना आज (6 एप्रिल) नागपूरमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट कल्याणचा उमेदवार कोण असणार हे जाहीर करून टाकलं. (lok sabha election 2024 kalyan constituency candidate announced directly by devendra fadnavis shiv sena leader shrikant shinde name announced)

शिवसेना (UBT) ने कल्याण मतदारसंघातून वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. अशातच काल (5 एप्रिल) कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली. जिथे निवडणुकीत श्रीकांत शिंदेंना मदत न करण्याची भूमिका घेण्यात आली. 

याचबाबत आज जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी सर्वात आधी कल्याणचा उमेदवार कोण असणार याची माध्यमांसमोरच घोषणा करून टाकली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Lok Sabha Election 2024: शिंदेंचं टेन्शन वाढणार, गणपत गायकवाडांच्या ऑफिसमध्ये काय घडलं?

फडणवीस म्हणाले की, कल्याण मतदारसंघातील उमेदवार हे शिवसेनेचे श्रीकांत शिंदेच असतील आणि भाजप त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली... 

पाहा फडणवीस श्रीकांत शिंदेंबाबत नेमकं काय म्हणाले

'भाजपकडून श्रीकांत शिंदेंना विरोध नाही. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भाजप त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणार आहे. पूर्ण ताकदीने.. आणि मागच्या वेळेस पेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदेंना कल्याणमधून आम्ही सगळे.. म्हणजे आम्ही सगळे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं, रासप आमची जी युती आहे.. ती युती त्यांना निवडून आणेल. हा विश्वास मी व्यक्त करतो.' असं मोठं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

हे ही वाचा>> Exclusive: '2009 सालीच NCP भाजपसोबत..', तटकरेंचा गौप्यस्फोट

ते पुढे असंही म्हणाले की, 'असं आहे की, शेवटी तीन पक्ष सोबत आहे.. त्यामुळे मित्र पक्षाचा सन्मान राखणं हे देखील महत्त्वाचं आहे. 33 जागा लढवू असा आमचा कधीच दावा नव्हता. आमचा प्रयत्न असा होता की, तिघांचा सन्मान राहून ज्या जागा मिळतील त्या जागा आपण लढल्या पाहिजे. त्यामुळे ज्या जागा मिळतील त्यावर मी समाधानी आहे.' असं फडणवीस म्हणाले. 

ADVERTISEMENT

फडणवीसांनी जयंत पाटलांना डिवचलं...

दरम्यान, यावेळी फडणवीसांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांच्याविषयीही विचारण्यात आलं. त्यावेळी फडणवीस म्हणाले की, 'जयंत पाटीलच आजकाल कालबाह्य झाले आहेत. मला माहिती आहे की, ते त्यांच्या पक्षात एवढे नाराज झाले आहेत की, त्यांच्या पक्षातच त्यांना कोणी विचारत नाही. बघा जयंत पाटील तुम्हाला कुठे दिसतायेत का? एवढी मोठी निवडणूक चालली आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण दिसतं. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार.. जयंत पाटील आहेत कुठे?' असं म्हणत फडणवीसांनी जयंत पाटलांना टोमणा लगावला आहे.

ADVERTISEMENT

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT