Lok Sabha Election 2024: 'श्रीकांत शिंदेंचा प्रचार करणार नाही', गणपत गायकवाडांच्या कार्यालयात भाजप कार्यकर्ते आक्रमक

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Kalyan Lok Sabha Election 2024 : आज (6 मार्च) नागपूरातील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा केली. पण, यासर्वात कल्याण लोकसभा जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण शुक्रवारी (5 मार्च) भाजपच्या स्थानिक नेते, पदाधिकारी यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघावरून आक्रमक भूमिका मांडली होती. (Kalyan Lok Sabha Election 2024 BJP activists decided not to work for Shrikant Shinde

भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत त्यांनी शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत यांच्यासाठी काम न करण्याचा इशारा दिला होता. अशा परिस्थितीत आता श्रीकांत शिंदेंना दिलेल्या उमेदवारीनंतर निवडणुकीचा हा प्रवास कसा असेल हे पाहणं रंजक असणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील जागा श्रीकांत शिंदेंऐवजी भाजपला द्यावी, अशी मागणी शुक्रवारी कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे केली होती. कल्याण हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा लोकसभा मतदारसंघ आहे, या लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा आज देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: केली आहे. यापूर्वी कल्याण पूर्व येथे भाजपचे पदाधिकारी आणि तुरुंगात असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या बैठकीत शिवसेनेच्या उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा न देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या लोकसभा जागेवरून भाजपच्या उमेदवाराने निवडणूक लढवावी, असं भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. 

कल्याण मतदार संघातील उमेदवारीवर भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी काय म्हणाले?

'मी याबाबत माहिती घेईन आणि काय झाले ते बघेन, पण आम्ही भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासोबत आहोत. या लोकसभा जागेवरून एनडीएचा उमेदवार जो कोणी असेल, त्याला आम्ही विजयी करू.' भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेल्या निर्णयावर भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी या प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT