Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात नवा ट्विस्ट, 'या' पक्षाने जाहीर केली पहिली यादी..

मुंबई तक

ADVERTISEMENT

प्रकाश शेंडगेंनी जाहीर केले 9 उमेदवार
प्रकाश शेंडगेंनी जाहीर केले 9 उमेदवार
social share
google news

OBC Bahujan party 1st list: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 साठी (Loksabha Election 2024) प्रकाश शेंडगे यांच्या OBC बहुजन पार्टीने आपले 9 उमेदवार जाहीर केले आहेत. ज्यामध्ये स्वत: प्रकाश शेंडगे यांचंही नाव जाहीर करण्यात आलं आहे. सांगलीमधून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका हा भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांना बसण्याची शक्यता आहे. ओबीसी ही भाजपची व्होट बँक आहे. अशावेळी ओबीसी नेते अशी ओळख असलेल्या प्रकाश शेंडगे यांनी स्वतंत्र उमेदवार दिल्याने भाजपला त्याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. (lok sabha election 2024 prakash shendge obc bahujan party announced 9 candidates bjp will suffer)

सर्वात आधी प्रकाश शेंडगे यांच्या पक्षाने नेमकी कोणाकोणाला उमेदवारी दिली ते आपण पाहूया. दरम्यान, यादी जाहीर करताना प्रकाश शेंडगे यांनी दोन महत्त्वाच्या घोषणाही केल्या आहेत. त्या म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा देण्यात आला आहे. तर याशिवाय अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनाही पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

हे ही वाचा>> जानकरांना शह देण्यासाठी पवारांची खेळी, माढ्यासाठी मास्टर प्लॅन!

याशिवाय प्रकाश शेंडगे यांनी बारामतीमधून महेश भागवत यांना उमेदवारी देऊ केली आहे. त्यामुळे पवार  विरुद्ध पवार या लढाईत ओबीसी बहुजन पक्ष काय भूमिका बजावणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

OBC बहुजन पक्षाची पहिली यादी 

  1. सांगली - प्रकाश (आण्णा) शेंडगे 
  2. बारामती - महेश भागवत
  3. परभणी - हरिभाऊ शेळके
  4. हिंगोली - रवी शिंदे
  5. नांदेड - अविनाश भोसीकर
  6. यवतमाळ - प्रशांत बोडखे
  7. बुलढाणा - नंदू लवंगे 
  8. शिर्डी - अशोक आल्हाट
  9. हातकणंगले - मनिषा डांगे/ संतोष कोळेकर

 

मराठा आणि ओबीसी मतांचा नेमका फायदा कोणाला होणार?

प्रकाश आंबेडकर यांनी सांगलीच्या जागेवर प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा जाहीर केल्याने शेंडगे यांनीही त्यांना अकोल्यातून पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर हे मनोज जरांगे यांच्याशी युती करणार असल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. अशावेळी प्रकाश शेंडगे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

ADVERTISEMENT

कारण मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी जी आक्रमक भूमिका घेतली त्या भूमिकेला प्रकाश शेंडगे यांनी बराच विरोध केला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळाल्यास हरकत नाही. मात्र, कुणबी म्हणून त्यांना आरक्षण मिळू नये अशी त्यांची भूमिका आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> निलेश लंके ढसाढसा रडले, दिला आमदारकीचा राजीनामा!

असं असताना प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे हे जर एकत्र आले तर प्रकाश शेंडगेंच्या भूमिकेत काही बदल होणार का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. 

यंदा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी मतं ही अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि त्याला ओबीसी नेत्यांकडून झालेला विरोध यामुळे मतांचं राजकारण हे पूर्णपणे बदललं जाऊ शकतं. त्यामुळे आता ही मतं कशा पद्धतीने विभाजित होतात आणि त्याचा नेमका फायदा कोणाला होणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT