Lok Sabha Election 2024: जानकरांना शह देण्यासाठी पवारांची खेळी, माढ्यासाठी मास्टर प्लॅन!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

शरद पवारांचा मास्टर प्लॅन
शरद पवारांचा मास्टर प्लॅन
social share
google news

Sharad Pawar vs Mahadev Jankar Madha Lok Sabha: सातारा: राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे अचानक महायुतीत सामील झाल्याने महाविकास आघाडी आणि विशेषत: शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. कारण माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपला आव्हान देण्यासाठी शरद पवारांनी जानकरांना लोकसभेच्या तिकीटाची ऑफर दिली होती. मात्र, त्यानंतर महादेव जानकर हे अचानक महायुतीत सामील झाले. त्याचविषयी बोलताना आज (29 मार्च) शरद पवारांनी नेमकं काय घडलं हे पत्रकार परिषदेत सांगितलं. (Mahadev Jankar rejected Sharad Pawar's offer and chose to join the Mahayutti. But even so, Pawar has prepared a master plan to win Madha Lok Sabha seat)

ADVERTISEMENT

'महादेव जानकरांसोबत बोलणं झालेलं पण..'

महादेव जानकरांविषयी जेव्हा पत्रकारांनी पवारांना विचारालं तेव्हा ते म्हणाले की,  'आमची इच्छा होती की, माढ्यात धनगर समाजाच्या उमेदवाराने निवडणूक लढवावी. ती इच्छा मी जाहीरपणे बोलून दाखवली. त्यासाठी ज्यांचं नाव तुम्ही घेतलं (महादेव जानकर) त्यांच्याशी आमचा विचार-विनिमय झाला होता. त्याला त्यांनी संमती दिली होती. मात्र, नंतर काय झालं ते समजलं नाही.'

हे ही वाचा>> पवारांनीही उडवली कॉलर, उदयनराजेंविरोधात पुन्हा मैदानात!

'निवडणुकीमध्ये मतदार पलटतात.. पण उमेदवारही पलटतात असं दिसतंय. असं काही चित्र त्या ठिकाणी दिसतंय. पण आमची जी काही इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी आम्ही योग्य उमेदवाराचा शोध घेत आहोत. आमच्याकडे लोकांचे अर्ज आहेत, मागणी आहे. अनेक उच्च शिक्षित लोक माढ्यातून इच्छुक आहेत. पण सामाजिक समतोल हा ठेवता आला तर आम्हाला आनंद होईल. त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे.' असं म्हणत पवार यांनी त्यांचा मास्टर प्लॅनच यावेळी सांगितला. 

हे वाचलं का?

माढ्यासाठी पवारांचा मास्टर प्लॅन काय?

भाजपने माढ्यातून रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी देऊ केली आहे. पण भाजपमधील एक गट आणि मित्र पक्षातील दिग्गज नेतेही निंबाळकरांविरोधात आहेत. याच गोष्टीचा फायदा उचलण्यासाठी शरद पवारांनी माढ्यातून महादेव जानकरांनी निवडणूक लढवावी असा प्रस्ताव देण्यात आला होता. ज्यासाठी जानकर देखील अनुकूल होते. मात्र, असं असताना अचानक जानकर हे महायुतीकडे गेले. त्यामुळे पवारांची खेळी मात्र काहीशी फसली.

जानकरांबाबत भाजपने जी चाल खेळली त्याने शरद पवार काही डगमगलेले दिसून येत नाही. कारण या जागेवर एखादा धनगर समाजाचा उमेदवार देण्याची खेळी पवारांनी खेळायचं ठरवलं आहे. त्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी देखील सुरू केली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Live : अजितदादाची दुसरी बायको म्हणजे सुनील तटकरे -जयंत पाटील

माढ्यात धनगर समाज हा प्रामुख्याने आहे. अशावेळी धनगर समाजाची मतं मिळविण्यासाठी त्याच समाजातील उमेदवार देण्याचा पवारांचा प्रयत्न आहे.

ADVERTISEMENT

एकीकडे रणजीतसिंह निंबाळकरांविरोधात असलेली नाराजी आणि दुसरीकडे धनगर मतं या सगळ्याचा फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला होऊ शकतो. असा अंदाज अनेक राजकीय विश्लेषक देखील वर्तवत आहेत. त्यामुळे जरी महादेव जानकर हे महायुतीसोबत गेले असले तरीही पवारांनी अद्यापही हार मानलेली नाही. किंबहुना... माढा काबीज करण्यासाठी एक मास्टर प्लॅनच तयार केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT