PM Modi Pune: 'भटकती आत्मा...', पवारांबाबत PM मोदीचं विधान BJP ला आणणार अडचणीत?
Lok Sabha Election 2024: भटकती आत्मा असा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. पण याच टीकेचा भाजपला फटका बसणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT

Lok Sabha Election 2024 PM Modi Pune Sharad Pawar: पुणे: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) चा महाराष्ट्रात आता तिसरा टप्पा सुरू झाला आहे. ज्यामध्ये आता बरीच रंगत पाहायला मिळत आहे. त्यातच स्वत: पंतप्रधान मोदींनी 'भटकती आत्मा' असं केलेलं विधान हे महाराष्ट्रात भाजपसाठी अडचणीचं ठरणार का? अशी जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे. (lok sabha election 2024 pune sabha wandering soul will pm modi statement about sharad pawar put bjp in trouble)
लोकसभा निवडणुकीसाठी बारामती आणि पुणे या मतदारसंघासाठी तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यात प्रचार सभा घेतली. याच सभेत पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवारांचं नाव न घेता अत्यंत जहरी टीका त्यांच्यावर केली.
'भटकती आत्मा' असा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. सगळ्यात आधी आपण पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊया.
'महाराष्ट्राने अनेक काळ राजकारणातील स्थिरता पाहिली आहे. आज मला काही बोलण्याआधी.. मी जे काही बोलेल ते कोणी वैयक्तिक टोपी आपल्या डोक्यावर घेऊ नये..'