Lok Sabha Election 2024 Result: 'ही' यादी खरीच ठरली.. 48 मतदारसंघाचा कोणी वर्तवलेला एवढा नेमका अंदाज?

मुंबई तक

Rudra Exit Poll: पुण्यातील ‘रुद्र रिसर्च अँड एनालिटिक्स’ या संस्थेचा लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्राबाबतचा एक्झिट पोल हा जवळजवळ खरा ठरला आहे. राज्यभरात त्यांच्या अचूकतेची चर्चा सुरु आहे.

ADVERTISEMENT

48 मतदारसंघाचा कोणी वर्तवलेला एवढा नेमका अंदाज?
48 मतदारसंघाचा कोणी वर्तवलेला एवढा नेमका अंदाज?
social share
google news

Lok sabha election 2024 Result and Rudra Exit Poll: पुणे: लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल हा नुकताच जाहीर झाला. यामध्ये विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे 1 जून 2024 रोजी रुद्र रिसर्च अँड एनालिटिक्स या संस्थेने जाहीर केलेला एक्झिट पोल हा जवळजवळ खरा ठरल्याचे दिसून आलं आहे. महाराष्ट्रातील 48 जागांबाबत विविध राजकीय विश्लेषक, विविध संस्था आणि विविध माध्यमांनी जाहीर केलेला एक्झिट पोल फोल ठरवत रुद्र रिसर्च अँड एनालिटिक्स या संस्थेने बाजी मारल्याचे दिसून येते. (this list turned out to be true who predicted the 48 constituencies of maharashtra)

विविध माध्यमांद्वारे प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या 26 पेक्षा अधिक जागा देणारी रुद्र रिसर्च अँड एनालिटिक्स ही एकमेव संस्था राज्यात किंबहुना देशात एकमेव ठरली आहे.

रुद्र रिसर्च अँड एनालिटिक्स या संस्थेने महाराष्ट्रात महायुतीला 43% तर महाविकास आघाडीला 46%, वंचित बहुजन आघाडीला 3% आणि इतर 8% मताधिक्य मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. आणि लागलेल्या निकालानुसार महायुतीला 43.54% तर महाविकास आघाडीला 44.92%, वंचित बहुजन आघाडीला- 2.77% आणि इतर 8.77% मते मिळाले असून सर्व पक्षांची टक्केवारीचा अंदाज तंतोतंत खरा आलेला आहे.

हे ही वाचा>> पहिलाच भाषणात नितीश कुमार PM मोदींना 'असं' का म्हणाले?

याशिवाय महाराष्ट्रात महायुतीला 13 तर महाविकास आघाडीला 34 आणि इतर 1 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. आणि लागलेल्या निकालानुसार महायुतीला 17 तर महाविकास आघाडीला 30 आणि इतर 1 जागा मिळाल्या. 

हे वाचलं का?

    follow whatsapp