NDA: पहिलाच भाषणात नितीश कुमार 'असं' का म्हणाले?, PM मोदींना जोरदार चिमटे!

मुंबई तक

ADVERTISEMENT

PM मोदींना नितीश कुमारांचे जोरदार चिमटे!
PM मोदींना नितीश कुमारांचे जोरदार चिमटे!
social share
google news

Nitish Kumar Speech on PM Modi: नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024)  मध्ये देशाच्या जनतेने यंदा NDA सरकारला कौल दिला. ज्यानंतर आज (7 जून) संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये NDA आणि नवनिर्वाचित खासदारांची बैठक पार पडली. ज्यामध्ये नरेंद्र मोदींची पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. यावेळी NDA मधील प्रमुख नेत्यांची भाषणंही झालं. ज्यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींना अनेकदा चिमटे काढले. (lok sabha election 2024 nda nitish kumar pinches pm modi in his first speech)

ADVERTISEMENT

पाहा संसदेतील सेंट्रल हॉलमधील भाषणात नेमकं काय-काय म्हणाले नितीश कुमार...

'ही गोष्ट खास आहे की, ते 10 वर्षांपासून पंतप्रधान आहेत आणि आता पुन्हा पंतप्रधान बनणार आहेत. त्यांनी संपूर्ण देशाची सेवा केली आणि पूर्ण विश्वास आहे की, जे काही शिल्लक राहिलं आहे पुढच्या वेळेस ते सगळं पूर्ण करतील आणि आम्ही पुढील सगळे दिवस त्यांच्यासोबत कायम राहू.' 

हे ही वाचा>> Uddhav Thackeray : शिंदेंचे 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात, भूकंप होणार?

'जे काही असेल.. आणि ते जे काही करतील ते चांगलंच असेल.. आम्हाला तर आता वाटतं की, पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा याल ना.. यावेळेस आपण पाहिलं की, इकडे-तिकडे जे काही जिंकलेत ना.. पुढच्या वेळेस सगळे हरलेत.. आम्हाला पूर्ण विश्वास आहे.' 
 

हे वाचलं का?

'हे सगळे निरर्थक बोलून बोलून.. यांनी काय काम केलंय का? त्या लोकांनी आजपर्यंत काही काम केलेलं नाही.. देशाची काही सेवा केलेली नाही.. पण तुम्ही एवढी सेवा केलीय.. त्यानंतर पुन्हा तुम्हाला संधी मिळाली.. तर या संधीनंतर आता त्या लोकांना काहीही आशा राहणार नाहीत.. त्या सगळ्या संपतील.' 

'बिहार आणि देश पुढे जाईल.. बिहारचं वैगरे सगळं काम होऊनच जाईल. जे काही उरलं आहे ते देखील करून टाकाल.. तुम्हाला जे हवंय त्या कामासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत..'

हे ही वाचा>> Live : मोदी 'या' दिवशी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधान पदाची शपथ

'मी सगळ्यांचं अभिनंदन करतो.. हेच म्हणेन की, सगळे जण सोबत राहू आणि एकत्रितपणे हे जे काही करतील त्यांचं म्हणणं मानून आम्ही पुढे जाऊ.' असं भाषण नितीश कुमार यांनी यावेळी केलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT