Mumbai Voting Date: मुंबईत 'या' दिवशी मतदान, मुंबईकरांनो पाहा तुमचा सगळा निवडणूक कार्यक्रम!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

मुंबईत लोकसभेसाठी कधी होणार मतदान?
मुंबईत लोकसभेसाठी कधी होणार मतदान?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यात होणार मुंबईत मतदान

point

मुंबईतील सहा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान

point

लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी

Lok Sabha Mumbai Voting Date: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 चं बिगुल अखेर आज (16 मार्च) वाजलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा केली. देशभरात 7 टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे. ज्याची सुरुवात ही 19 एप्रिलला होणार आहे तर त्याची सांगता 1 जून रोजी होणार आहे. याशिवाय महाराष्ट्र आणि विशेषत: मुंबईत नेमकं कधी मतदान असणार आहे हे आपण पाहूयात. (lok sabha election 2024 voting for lok sabha elections will be held in mumbai on 20th may 2024 mumbaikars see your entire election programme)

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यांमध्ये मतदान होईल. ज्याची सुरुवात म्हणजेच पहिला टप्पा हा 19 एप्रिलला असणार आहे. तर शेवटचा आणि पाचवा टप्पा हा 20 मे रोजी असणार आहे. याच शेवटच्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघासाठी मतदान होईल. याशिवाय एमएमआरडी रिजनमधील बहुतेक भागात मतदान होईल.

लोकसभा निवडणूक: मुंबईतील संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जसाच्या तसा... 

1. कधी जारी होणार अधिसूचना?: मुंबईतील एकूण 6 मतदारसंघामध्ये एकाच दिवशी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 26 एप्रिल 2024 रोजी अधिसूचना जारी केली जाईल.

हे वाचलं का?

2. निवडणूक अर्ज भरण्याची शेवटची तारीख: निवडणूक अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 3 मे 2024 रोजी आहे.

3. अर्ज छाननी: लोकसभा निवडणुकीसाठी जे अर्ज दाखल झाले असतील त्याची छाननी केली जाईल. ज्याचा शेवटचा दिवस हा 4 मे 2024 ही असणार आहे. 

ADVERTISEMENT

4. निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस: निवडणूक दाखल झाल्यानंतर अनेकदा अनेक पक्षांमध्ये बंडखोरी होती. अशाच बंडखोर उमेदवारांचा फटका बसू नये यासाठी शेवटपर्यंत पक्षांकडून प्रयत्न सुरू असतात. त्यांच्यासाठी निवडणूक अर्ज मागे घेण्याच शेवटचा दिवस हा महत्त्वाचा ठरतो. मुंबईत निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस हा 6 मे 2024 आहे. 

ADVERTISEMENT

5. मतदानाचा दिवस: मुंबईतील सहाही मतदारसंघासाठी 20 मे 2024 रोजी मतदान पार पडणार आहे. 

6. निकालाचा दिवस: देशातील सातही टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर 4 जून 2024 रोजी निवडणुकीचा निकाल हा जाहीर केला जाणार आहे.

शेवटच्या टप्प्यात मुंबईसह कोणकोणत्या मतदारसंघामध्ये होणार मतदान? 

महाराष्ट्रातील पाचवा टप्पा हा शेवटचा असणार आहे. ज्यामध्ये मुंबईतील 6 मतदारासंघांसह एकूण 13 मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. ज्यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, ईशान्य मुंबई -(उत्तर-पूर्व), उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई येथे मतदानाची प्रक्रिया पार पडेल.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT