Pune Voting Date: पुण्यात 'या' तारखेला मतदान, पुणेकरांनो पाहा कसा आहे निवडणूक कार्यक्रम
Lok Sabha Election 2024 Pune Voting Date: महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात पार पडणार आहे. ज्यापैकी चौथ्या टप्प्यात पुण्यातील मतदान असणार आहे. पाहा पुण्यातील नेमका निवडणूक कार्यक्रम कसा असेल.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पुण्यात कधी असणार मतदान?
पाहा पुण्यातील निवडणुकीचा नेमका कार्यक्रम
चौथ्या टप्प्यात पुण्यातील निवडणूक
Lok Sabha Pune Voting Date: पुणे: लोकसभा निवडणूक 2024 साठी आज (16 मार्च) तारखा जाहीर करण्यात आल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या तारखांची घोषणा केली. यंदा देशभरात 7 टप्प्यांमध्ये निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीची सुरुवात ही 19 एप्रिलपासून होणार आहे. तर 1 जून रोजी ही निवडणूक संपेल. महाराष्ट्रात पाच टप्प्यात असलेल्या निवडणुकीत चौथा टप्पा हा पुणेकरांसाठी महत्त्वाचा असणार आहे. जाणून घ्या नेमकं कधी मतदान कधी असणार. (lok sabha election 2024 voting for lok sabha elections will be held in pune and 11 constituency on 13th may 2024 punekars see your entire election programme)
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. ज्याचा पहिला टप्पा 19 एप्रिलला असेल. तर शेवटचा टप्पा हा 20 मे रोजी असणार आहे. ज्यापैकी चौथ्या टप्प्यात पुण्यासह, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि मराठवाड्यातील काही मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणूक: पुण्यातील संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जसाच्या तसा...
अधिसूचना कधी जारी होणार?: पुण्यासह एकूण 11 मतदारसंघामध्ये एकाच दिवशी मतदान घेतलं जाईल. या निवडणुकीसाठी 18 एप्रिल 2024 रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे.
हे वाचलं का?
निवडणूक अर्ज भरण्याची शेवटची तारीख: निवडणूक अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 25 एप्रिल 2024 रोजी आहे.
अर्ज छाननी: लोकसभा निवडणुकीसाठी आलेल्या अर्जाची छाननी केली जाईल. ज्याचा शेवटचा दिवस 26 एप्रिल 2024 हा आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Maharashtra Lok Sabha 2024 Dates : तुमच्या मतदारसंघात कधी होणार मतदान?
निवडणूक अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची तारीख: पुणे आणि एकूण 11 मतदारसंघांमधील निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस हा 29 एप्रिल 2024 आहे.
ADVERTISEMENT
कोणत्या दिवशी मतदान?: पुण्यासह एकूण 11 मतदारसंघासाठी 13 मे 2024 रोजी मतदान घेतलं जाणार आहे.
निकाल कधी?: देशातील सातही टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर 4 जून 2024 रोजी निवडणुकीचा निकाल हा जाहीर केला जाणार आहे.
चौथ्या टप्प्यात पुण्यासह कोणकोणत्या मतदारसंघामध्ये होणार मतदान?
महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यात पुण्यासह एकूण 11 मतदारासंघांत 13 मे रोजी मतदान होणार आहे. ज्यामध्ये नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड येथे मतदान घेतलं जाईल.
महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान, पाहा कोणत्या टप्प्यात कुठे पार पडणार निवडणूक
1. पहिला टप्पा - 19 एप्रिल: रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदारसंघात मतदान घेण्यात येईल.
2. दुसरा टप्पा - 26 एप्रिल: बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडेल
3. तिसरा टप्पा - 7 मे: रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात मतदान होईल.
हे ही वाचा>> Lok Sabha Election 2024: निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर!
4. चौथा टप्पा - 13 मे: नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांमध्ये मतदान घेण्यात येईल.
5. पाचवा टप्पा (महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा) - 20 मे: धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, ईशान्य मुंबई -(उत्तर-पूर्व), उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई येथे मतदान होईल आणि त्यासोबतच लोकसभा निवडणुकीची महाराष्ट्रातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT