Manoj Jarange: '...तर थेट नाव घेऊन पाडणार', जरांगेंचा आमदारांना धडकी भरवणारा इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

manoj jarange warning for vidhan sabha election for mla mahayuti eknath shinde maratha reservation
हे सरकारचे षडयंत्र आहे.
social share
google news

Manoj Jarange  Warning : लोकसभा निवडणुकीत अनेक मतदार संघात जरांगे फॅक्टर दिसून आला. ज्यामुळे विशिष्ट मतदार संघात  महायुतीच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाला.या निवडणुकीनंतर आता हाच फॅक्टर विधानसभेत दिसून येणार आह. कारण 'मराठा आरक्षण (Maratha Reservation) दिले नाही तर विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर उमेदवार देणार असून थेट नाव घेऊन पाडणार' असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange)  आमदारांना दिला आहे. त्यामुळे आमदारांची धाकधुक चांगलीच वाढली आहे. (manoj jarange warning for vidhan sabha election for mla mahayuti eknath shinde maratha reservation) 

ADVERTISEMENT

मनोज जरांगे पाटलांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. यावेळी आंदोलन स्थळावरून माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले की, मला राजकारणात यायचं नाही, आमच्या समाजाला सुद्धा जायचं नाही. आमचं ध्येय मराठा आरक्षण आहे, त्यामुळे आमचं ठरलेले आरक्षण आम्हाला द्या, मग हेच लोकं तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. आणि नाही दिलं तर विधानसभा निवडणुकीत सर्व जाती-धर्माचे 288 उमेदवार उभे करणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. 

हे ही वाचा : 'मी एक मिनिटंही शांत बसलो नव्हतो..', फडणवीसांचं मोठं विधान..

आंदोलनाला परवानगी नाकारल्याच्या मु्द्यावर जरांगे म्हणाले की, हे सरकारचे षडयंत्र आहे. त्यांनी जाणून बुजून परवानगी नाकारली. सरकारला गोरगरीब मराठ्यांचे आंदोलन मोडीत काढायचे आहे. त्यांना मराठे मोठे होऊ द्यायचे नाही आहे. हे त्यांच स्वप्न आहे. पण मला घटनेने शांतपणे आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. मी शांतपणे उपोषण करत आहे. आमचे आंदोलन स्थगित होते आणि स्थगित आंदोलनाला परवानगीची आवश्यकता नाही, असे मनोज जरांगेंनी स्पष्ट केले आहे. 

हे वाचलं का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगेसोयरे अधिसुचनेची तत्काळ अंमबजाणवी करावी यासाठी उपोषणाला सुरूवात केली आहे. सरकारने अद्याप  मराठ्यांच्या पोरांवरील गुन्हे मागे घेतलेले नाहीत.मला राजकारणात यायचं नाही, आमच्या समाजाला सुद्धा जायचं नाही. आमचं ध्येय मराठा आरक्षण आहे, त्यामुळे आमचं ठरलेले आरक्षण आम्हाला द्या, मग हेच लोकं तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, असे जरांगे यांनी म्हटलं आहे. 

हे ही वाचा : ठाकरेंना झटका, 6 खासदार शिंदेंच्या संपर्कात?; शिवसेना नेत्याच्या दावाने खळबळ

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT