Devendra Fadnavis: 'मी एक मिनिटंही शांत बसलो नव्हतो..', शाहांची भेट अन् फडणवीसांचं मोठं विधान..
Devendra Fadnavis BJP: देवेंद्र फडणवीस यांनी भाजपकडे त्यांना सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी केली. त्यानंतर मुंबईतील आमदारांच्या बैठकीत त्यांनी एक मोठं विधान केलं.
ADVERTISEMENT

BJP Maharashtra: मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्याला सरकारमधून मोकळं करावं असं म्हटलं होतं. त्यानंतर काल (7 जून) अमित शाहांशी झालेल्या भेटीनंतर फडणवीसांनी दिल्लीत नेमकं काय घडलं ते जाहीरपणे सांगितलं. (devendra fadnavis big statement after amit shah meeting i didnt sit still even for a minute)
मुंबईत आज भाजपच्या सर्व आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी फडणवीस असं म्हणाले की, 'अमित शाहांनी मला सांगितलं की, आता हे सगळं काम चालू द्या. मग नंतर आपण काय ब्ल्यूप्रिंट तयार करायचीय महाराष्ट्राची.. ती तयार करू.. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत.. याही किंवा त्याही.. कुठल्याही परिस्थितीत.. मी एक मिनिटं देखील मी शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाहीए..'
हे ही वाचा>> देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं, 'सहानुभूती होती तर...'
देवेंद्र फडणवीसांचं भाषण जसंच्या तसं...
'हे खरं आहे की, एकीकडे देशामध्ये लोकांनी पुन्हा एनडीए आणि मोदीजींवर विश्वास दाखवला. त्याचवेळी आपल्या मनात ही सल देखील आहे की, मोदीजींच्या यशामध्ये सिंहाचा वाटा 2014 आणि 2019 मध्ये आपला होता. यावेळी तो वाटा आपण उचलू शकलो नाही..'
'म्हणून एकदा पुनरावलोकन व्हावं आणि नव्याने आपल्याला व्यूहरचना तयार करता यावी या दृष्टीने आजची बैठक महत्त्वाची आहे. त्यासोबत आपण सगळ्यांनी हा निर्धार केलाय की, महाराष्ट्रात जे काही अपेक्षित यश आलेलं नाही त्याची कारणं त्याठिकाणी शोधून ती दूर कशी करता येतील आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार कसं आणता येईल हा जो निर्धार व्यक्त केला त्यासाठी मी आपले आभार मानतोय.'