Maharashtra Lok Sabha : देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं, 'सहानुभूती होती तर...'
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : 2014 आणि 2019 मोदींच्या यशात आपला वाटा सिंहाचा वाटा होता. पण यावेळी तो वाटा आपण उचलू शकलो नाही. म्हणून पुर्नरावलोकन व्हावे आणि नव्याने रणनिती आखता यावे यासाठीची बैठक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
Devendra Fadnavis Criticized Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरेंसोबत जर सहानुभूती होती तर मुंबईत, कोकणात ती दिसली का नाही? ठाण्यापासून ते कोकणच्या टोकापर्यंत उद्धव ठाकरेंची एकही जागा आली नाही. कोकणात ठाणे, पालघर, रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड यात उबाठाला एकही जागा आली नाही, असे विधान करून देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) डिवचलं आहे. तसेच मुंबईच्या जागा मराठी मतांवर नाही तर एका विशिष्ट समाजाच्या मतांवर आघाडी घेतली. बाकी इतर ठिकाणी उबाठा हद्दपार झाल्याची टीका फडणवीसांनी ठाकरेंवर केली. (devendra fadnavis criticized udhhav thackeray on maharashtra lok sabha result shiv sena ubt sympathy vote mumbai lok sabha)
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस भाजपच्या बैठकीत बोलत होते. देशाच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे आणि नेहरूंजींच्या जो रेकॉर्डची बरोबरी करणाऱ्या मोदीजींची एनडीएने एकमताने निवड केली आहे. 2014 आणि 2019 मोदींच्या यशात आपला वाटा सिंहाचा वाटा होता. पण यावेळी तो वाटा आपण उचलू शकलो नाही. म्हणून पुर्नरावलोकन व्हावे आणि नव्याने रणनिती आखता यावे यासाठीची बैठक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
हे ही वाचा : 'या' 5 नेत्यांपैकी कोण होऊ शकतो उपमुख्यमंत्री?, पण...
फडणवीस पुढे म्हणाले, यशाचे बाप अनेक असतात. पण अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असतं. ते पचवायचं असतं, नवीन निर्धार करायचा असतो. या निवडणुकीत भापजचे नेतृत्व मी करत असल्याने अपयशाची जबाबदारी माझी आहे. तसेच मला मोकळं करून काम करण्याची संधी द्या, हे मी नैराश्यातून बोललो नाही. देवेंद्र फडणवीस हा पळणारा नाही तर लढणारा व्यक्ती आहे. चारही बाजूने वेढल्यानंतर पुरंदरचा तह करणारे पुन्हा ताकदीने मैदानात उतरून ते सर्व किल्ले पुन्हा जिंकणारे छत्रपती शिवराय हे आमचे प्रेरणा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हे वाचलं का?
तसेच कुणाला वाटलं असेल मी निराश झालो, भावनिक झालो आहे तर ते सत्य नाही. माझ्या डोक्यात स्ट्रेटेजी होती. मी अमित शाहांनाही भेटून आलो. त्यांची तुमच्यासारखी प्रतिक्रिया होती. आता सगळं हे काम चालू द्या. मग आपण महाराष्ट्राची ब्लु प्रिंट तयार करू.. कुठल्याही परिस्थितीत मी एक मिनिट देखील शांत बसलो नाही आणि बसणार नाही. महाराष्ट्रात अपेक्षित यश आलं नाही त्याची कारणे शोधून कशी ती दुर करता येतील आणि विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार कसं आणला येईल याबाबत निर्धार व्यक्त केला, असे फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा : ठाकरेंना झटका, 6 खासदार शिंदेंच्या संपर्कात?; शिवसेना नेत्याच्या दावाने खळबळ
उन्हाळ्याची काहिली संपतेय, पावसाळा जवळ आलाय. पावसाळ्यात जे पेरलं जातेय तेच संप्टेंबर,ऑक्टोबरमध्ये उगवतं. आता नव्याने पेरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आपण पुन्हा ताकदीने मैदानात उतरून आणि मैदान फतेह करू. मी जोपर्यंत महाराष्ट्रात महायुतीचा झेंडा रोवत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT