Lok Sabha : शरद पवारांच्या 'या' खासदाराचा अजितदादांना फोन?, NCP मध्ये मोठी घडामोड!

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mp bajrang sonwane two times contact ajit pawar amol mitari tweet sharad pawar ncp politics
एक तर सकाळी गळाला लागल्यासारखा बोलतोय.
social share
google news

Amol Mitkari Big Statement : : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांकडून अनेक आमदार, खासदार संपर्कात असल्याचे दावे प्रतिदावे केले जात आहेत.असे असताना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari)  यांनी ''बीडच्या बाप्पांचा दादांना फोन'' आल्याचे  ट्विट करून खळबळ उडवून दिली होती. मिटकरींच्या या ट्विटनंतर आता शरद पवारांचा (Sharad Pawar) खासदार अजित पवारांच्या (Ajit Pawar) गळाला लागल्याची चर्चा सुरू राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (mp bajrang sonwane two times contact ajit pawar amol mitari tweet sharad pawar ncp politics) 

अमोल मिटकरी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आज  ''बीडच्या बाप्पांचा दादांना फोन'' आल्याचे म्हटले होते. बीडचे बाप्पा म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांनी अजितदादांना दोनदा फोन केल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे मिटकरी यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊन याबाबत सविस्तर माहिती देखील दिली. 

हे ही वाचा : विधानसभेत महायुतीला बसणार जबर झटका, मविआचं काय?

एखाद्याच्या साखर कारखान्याच्या मजुरीचा प्रश्न आहे. तो व्यक्ती दुसऱ्या गटाचा खासदार असेल, आणि तो व्यक्ती स्वत: दादांना फोन करून विनंती करत असेल तर माझ्या सारख्या सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासाठी भुषवणाह बाब आहे. यावरून अजित दादा राज्याच्या केंद्रस्थानी किती महत्वाचे व्यक्ती आहे हे ही दिसून येते. त्यामुळे एक तर सकाळी गळाला लागल्यासारखा बोलतोय, त्यामुळे लवकरच तुम्हाला मोठा पिक्चर दिसेल, असे अमोल मिटकरी यांनी विधान करून खळबळ उडवून दिली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान मिटकरी यांच्या या दाव्यावर ना बजरंग सोनवणे, ना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. 

हे ही वाचा : ठाकरेंनी पटोलेंचा फोन टाळला? महाविकास आघाडीत काय घडतंय?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT