Lok Sabha 2024 : 500 रुपयांत गॅस सिलिंडर; पवारांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा

मुंबई तक

NCP Sharadchandra Pawar Manifesto : शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.

ADVERTISEMENT

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा केल्या आहेत?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जाहीरनामा

point

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा

point

जयंत पाटलांनी दिली माहिती

NCP SharadChandra Pawar Party Manifesto Released : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. शपथनामा असं जाहीरनाम्याला म्हटलं असून, त्यात पक्षाची लोकसभेत काय भूमिका असेल, याबद्दल काही घोषणा केल्या आहेत. (Nationalist Congress party Sharadchandra Pawar Manifesto)

पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत शपथनामा प्रसिद्ध करण्यात आला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीरनाम्यातील घोषणांची माहिती दिली. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीरनाम्यात काय?

- गेल्या दहा वर्षात मतदारांची फसवणूक झालेली आहे. महागाई वाढली आहे. बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांची दुरावस्था झाली आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर, नोटाबंदी, खासगीकरण करण्यावर सरकारचा भर आहे. या सगळ्यांवर आम्ही शपथपत्रात भूमिका मांडलेली आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

हेही वाचा >> भाजपला 'डीएमके' फॅक्टरची चिंता! कुठे बसू शकतो फटका? 

-समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती कमी करू. ५०० रुपयांच्या दरम्यान निश्चित करू. त्यासाठी गरज वाटली, तर केंद्र सरकार त्याला अनुदान देईल. जसं पूर्वी युपीएच्या राजवटीत होत होतं, असे पाटील म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp