Lok Sabha Election 2024: शरद पवारांच्या NCP उमेदवारांची घोषणा, पाहा संपूर्ण यादी

रोहित गोळे

NCP- Sharad Pawar 1st list: लोकसभा निवडणूक 2024 साठी (Lok Sabha Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे.

ADVERTISEMENT

NCP (पवार गट) च्या उमेदवारांची घोषणा
NCP (पवार गट) च्या उमेदवारांची घोषणा
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवारांच्या NCP उमेदवारांची घोषणा

point

पहिल्या यादीत सुप्रिया सुळेंच्या नावाची घोषणा

point

जयंत पाटलांनी पाच उमेदवार केले घोषित

Lok Sabha Election 2024 NCP Sharadchandra Pawar party 1st list: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 साठी (Lok Sabha Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाने आज (30 मार्च) आपली पहिली यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि निलेश लंके यांच्यासह पाच जणांची नावं जाहीर करण्यात आली. (ncp sharadchandra pawar party candidates announcement for lok sabha election 2024 see full List)

पाहा राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी 

  • वर्धा - अमर काळे
  • दिंडोरी - भास्कर भगरे 
  • बारामती - सुप्रिया सुळे 
  • शिरूर - अमोल कोल्हे 
  • अहमदनगर - निलेश लंके 

या पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. तसंच इतर मतदारसंघातील उमदेवारांच्या नावाची देखील लवकर घोषणा करण्यात येईल असं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं.

'या' जागांवरील उमेदवारांबाबत अद्यापही सस्पेन्स कायम 

पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्या यादीत केवळ पाचच उमेदवार जाहीर केले आहेत. पण त्यांच्याकडील बीड, रावेर, माढा, सातारा आणि भिवंडी येथील उमेदवार त्यांनी अद्यापही जाहीर केलेले नाहीत. या पाच पैकी चार मतदारसंघ हे शरद पवारांच्या पक्षासाठी सुटले आहेत. फक्त भिवंडीमध्ये काँग्रेससोबत त्यांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे इतर चार मतदारसंघातील उमेदवार का जाहीर करण्यात आले नाहीत याविषयी आता सवाल उपस्थित केले जात आहे. 

बीड, रावेर, माढा, सातारा या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षच लढणार हे आता जवळजवळ निश्चित झालं आहे. पण असं असलं तरीही या जागांवर नेमका कोणता उमेदवार द्यायचा यावर पक्षात सध्या खलबतं सुरू आहेत. त्यामुळेच येथील उमेदवार अद्याप जाहीर न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp