Nilesh Lanke : ईव्हीएम स्ट्राँगरुमपर्यंत गेला अन्...; लंकेनी व्हिडीओच दाखवला

मुंबई तक

Nilesh Lanke ahmednagar lok sabha lok sabha election 2024 : निलेश लंके यांनी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रुमचा व्हिडीओ शेअर केला आहे.

ADVERTISEMENT

निलेश लंके यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत दिसणारा व्यक्ती.
निलेश लंके यांनी ईव्हीएम असलेल्या स्ट्राँगरुमचा व्हिडीओ शेअर केला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ईव्हीएम स्ट्राँग रुमचा व्हिडीओ

point

सीसीटीव्ही यंत्रणेत बिघाड करण्याचा प्रयत्न

point

निलेश लंकेंनी शेअर केला व्हिडीओ

Maharashtra Lok Sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पाचही टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. आता सर्व राजकारणी डोळ्यात तेल घालून ईव्हीएम असलेल्या स्टाँगरुमवर नजर ठेवून आहेत. अशातच दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या निलेश लंके यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात एक व्यक्ती तिहेरी सुरक्षा व्यवस्था भेदून ईव्हीएम असलेल्या स्ट्राँगरुमपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. (In the video shared by Nilesh Lanka, a person is seen near the EVM Strong room)

महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. मतदान झाल्यानंतर आता सगळ्यांना निकालाची प्रतिक्षा आहे. ४ जून रोजी निकाल असल्याने तोपर्यंत विरोधी पक्षाचे उमेदवार आणि नेते ईव्हीएम असलेल्या स्ट्राँगरुमवर बारीक नजर ठेवून आहेत. 

मतदान पार पडल्यापासून निवडणुकीचे वेगवेगळे व्हिडीओ समोर येत असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनीही चिंता व्यक्त केली आहे. 

ईव्हीएम स्ट्राँगरुमचा व्हिडीओ, निलेश लंके काय म्हणाले?

"संरक्षण व्यवस्था थोडे उठा, माणूस गोदामापर्यंत आलाय. काल (२१ मे) रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्हीमध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला."

हे वाचलं का?

    follow whatsapp