Pune Accident वर राहुल गांधी संतापले, म्हणाले, 'निबंध लिहण्याची शिक्षा...'

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

rahul gandhi reaction on pune porsche accident two killed in road accident builder vishal agarawal son pune crime news
न्याय देखील श्रीमंताचा गुलाम झाली आहे.
social share
google news

Rahul Gandhi On Pune Accident : पुण्यातील कार अपघात (Pune Porsche Accident) प्रकरण राज्यासह, देशात प्रचंड तापले आहे. या अपघाताच्या घटनेवरून विविध स्तरातून संतापजनक प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) या घटनेवर भाष्य करत संताप व्यक्त केला आहे. अपघात झाल्यास निबंध लिहण्याची हीच शिक्षा तुम्ही ट्रक चालक, बस चालक, ओला, उबेर आणि रिक्षा चालकांना देणाक का? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. (rahul gandhi reaction on pune porsche accident two killed in road accident builder vishal agarawal son pune crime news) 

राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे.या व्हिडिओतून राहुल गांधी यांनी पु्ण्यातील अपघाताच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी म्हणाले, 'बस चालक, ट्रक चालक, ओला, उबेर आणि रिक्षा चालक यांच्याकडून जर चुकून कुणाचा अपघाती मृत्यू झाला, तर त्यांना 10 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होते. पण जर श्रीमंताच्या घरातला 17 वर्षाचा मुलगा मंद्यधुंद अवस्थेत पोर्शे गाडी चालवून दोघांचा जीव घेत असेल तर त्याला निबंध लिहण्याची शिक्षा दिली जाते. मग हीच शिक्षा ट्रक ड्रायव्हर, बस ड्रायव्हर, ओला, उबेर चालकांकडून का दिली जात नाही, असा सवाल राहुल गांधींनी विचारला.  

हे ही वाचा : Lok Sabha : कपिल पाटलांचा 'तो' Video रोहित पवार चिडले!

राहुल गांधी पुढे म्हणाले, नरेंद्र मोदींना एक प्रश्न विचारण्यात आला होता. देशात दोन हिंदुस्थान बनतायत, एक अरबपतींचा दुसरा गरीबांचा? यावर त्यांचं उत्तर आलं, मी सर्वांना गरीब बनवू का ? पण प्रश्न हा नाही आहे. प्रश्न न्यायाचा आहे. श्रीमंतांना आणि गरीबांना दोघांना न्याय मिळाला पाहिजे. न्याय सर्वांसाठी एकसारखाच असला पाहिजे. यासाठी आम्ही लढतोय, अन्यायाविरूद्ध आम्ही लढतोय, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नेमकं प्रकरण काय?

पुण्याच्या कल्याणीनगर भागात मद्यधुंद अवस्थेत पोर्शे गाडी चालवणाऱ्या एका बिल्डरच्या पोराने दोन जणांना उडवल्याची घटना घडली होती. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी आरोपी मुलाला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले होते. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर 15 तासांत त्याला जामीन देण्यात आला होता. अपघातावर निबंध लिहावा, ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभं राहुन वाहतुकीचे नियोजन करावे आणि अपघातग्रस्तांना मदत करावी,अशा अटींवर हा जामीन मंजूर झाला होता. या शिक्षेच्या तरतुदीनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. 

हे ही वाचा : संभाजीनगरची तनिशा राज्यात अव्वल, बारावीत मिळवले 100 पैकी 100 मार्क

    follow whatsapp

    ADVERTISEMENT