Lok Sabha : 'ही मस्ती BJP नेत्यांच्या अंगात येतेच कुठून?', कपिल पाटलांचा 'तो' Video रोहित पवार चिडले!
Rohit Pawar On Kapil Patil Video : केंद्रीय मंत्री राहिलेले भिवंडी मतदार संघातील भाजपचे उमेदवार पोलीस अधिकाऱ्यांना अत्यंत खालच्या पातळीवर शिव्या देतात. अशाप्रकारची मस्ती भाजप नेत्यांच्या अंगात येतेच कुठून, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT
Rohit Pawar On Kapil Patil Video : भिवंडी मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या अरेरावीचा व्हिडिओ सोमवारी समोर आला होता. या व्हिडिओत कपिल पाटील (Kapil Patil) पोलीस अधिकाऱ्यांना अपशब्द वापरताना दिसले होते. त्यानंतर आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कपिल पाटलांचा आणखीण व्हिडिओ समोर आणला आहे. हा व्हिडिओ एक्सवर पोस्ट करून रोहित पवारांनी भाजप नेत्याच्या अंगात ही मस्ती येत तरी कुठुन? असा सवाल केला आहे. (rohit pawar share kapil patil video abbuse statement against police polling booth bhiwandi lok sabha election 2024)
ADVERTISEMENT
रोहित पवारांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कपिल पाटलांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.हा व्हिडिओ शेअर करून रोहित पवारांनी कपिल पाटलांवर टीका केली आहे. रोहित पवारांनी नेमकं त्यांच्या पोस्टमध्ये काय लिहलंय हे जाणून घेऊयात.
हे ही वाचा : Pune Accident News : 'त्या' आरोपी मुलाचा जबाब जसाच्या तसा...
केंद्रीय मंत्री राहिलेले भिवंडी मतदार संघातील भाजपचे उमेदवार पोलीस अधिकाऱ्यांना अत्यंत खालच्या पातळीवर शिव्या देतात. अशाप्रकारची मस्ती भाजप नेत्यांच्या अंगात येतेच कुठून, असा प्रश्न पडतो. कदाचित सागर बंगल्यावर बसलेल्या त्यांच्या बॉसचे विशेष संरक्षण असल्याने ही मस्ती येत असावी. असो, पण हा अहंकार आणि सत्तेची मस्ती चार जूनला उतरल्याशिवाय राहणार नाही!
हे वाचलं का?
मतदान केंद्रावर पोलिसांसोबत अरेरावी
भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील हे खंडूपाडा बाला कंपाऊड मिल्लत नगर येथील अल्पसंख्याक बहुल असलेल्या मतदान केंद्रावर दाखल झाले होते. या मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला होता. याच घटनेवरून कपिल पाटील प्रचंड चिडले होते आणि त्यांनी मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.
दरम्यान, कपिल पाटील यावेळी दमदाटी करत असताना त्यांच्या तोंडून अपशब्द देखील बाहेर पडले होते. व्हायरल व्हिडिओत मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांच्या गराड्यात असताना इतर ठिकाणी का गर्दी आहे? असा दम देत, तेथील आपले कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना दादागिरीच्या भाषेत 'डोळे फुटलेत का तुझे भ&@# तिकडे काय &@#** मारतो का?' असे बेताल वक्तव्य करताना दिसत व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : HSC Results 2024: राज्यात '12वी'चा निकाल जाहीर, मुंबईचा कितवा क्रमांक?
एक जबाबदार लोकप्रतिनिधी आणि केंद्रीय मंत्री असलेले कपिल पाटील हे जर पोलिसांशी अशा भाषेत बोलत असतील आणि सार्वजनिकरित्या अशा प्रकारचं वर्तन केल्याने भिवंडीमधील अनेक नागरिकांनी त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, कपिल पाटील यांचा हा अरेरावीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही होत आहे. ज्यामुळे कपिल पाटील हे सध्या बरेच अडचणीत सापडले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT