Pune Accident : 'मी दारू पितो, माझ्याकडे ड्रायव्हिंग...', 'त्या' आरोपी मुलाचा जबाब जसाच्या तसा...

मुंबई तक

ADVERTISEMENT

pune accident news builder vishal agrawal son confession to police porsche car accident two killed
पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाचा जबाब नोंदवला आहे.
social share
google news

Pune Accident News : पुण्याच्या कल्याणीनगर भागात रविवारी पोर्शे गाडीने (Porsche Car Accident) दोन जणांना चिरडल्याची घटना घडली होती. प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांच्या अल्पवयीन मुलाच्या हातून मद्यधुंद अवस्थेत ही भयानक घटना घडली होती. या घटनेतून आरोपी अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न झाला होता. कारण 15 तासांत मुलाला जामीन मिळाला होता आणि न्यायालयाने त्याला अपघातावर निबंध लिहण्याची शिक्षा दिली होती. त्यानंतर हे प्रकरण चांगलच तापलं होतं. त्यात आता अल्पवयीन मुलाने पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला आहे. या जबाबात मुलाने धक्कादायक खुलासे केले आहेत.  (pune accident news vishal agrawal son confession to police porsche car accident two killed) 

ADVERTISEMENT

पुण्यातील या अपघाताच्या घटनेने राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या भूमिककडेही संशयाने पाहिले जात आहेत.त्यानंतर आता पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाचा जबाब नोंदवला आहे. लोकमत या मराठी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. या जबाबात आरोपी मुलाने खळबळजनक खुलासे केले आहेत.

हे ही वाचा : 'डोळे फुटलेत का तुझे भ&@#', कपिल पाटलांची पोलिसांवर अरेरावी

'मी कार चालविण्याचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. माझ्याकडे वाहन चालविण्याचाही कोणताही परवानाही नाही. वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची कार माझ्याकडे दिली होती. आणि मित्रांसह हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करतो हे वडिलांना महिती होते', अशी माहिती आता आरोपीने पोलीस जबाबात दिली माआहे. 

हे वाचलं का?

या प्रकरणी ब्रम्हा ग्रुपचे विशाल अग्रवाल यांच्यासह अल्पवयीन मुलाला बार, पबमध्ये  प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

हे ही वाचा : '6 जूनला आरक्षण द्या, अन्यथा...', जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT