Nilesh Lanke : ''माझ्या मुलाला मारण्याचा कट...'', लंकेंच्या आईच्या विधानाने खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

nilesh lanke reaction on lok sabha result ahmednagar lok sabha election 2024 nilesh lanke won sujay vikhe patil
निलेश लंकेवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
social share
google news

Nilesh Lanke News : अहमदनगर लोकसभा मतदार संघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी विद्यमान खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांचा पराभव केला. यानंतर आता निलेश लंकेवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. या आनंदाच्या क्षणी निलेश लंके यांच्या कुटुंबियांच्याही प्रतिक्रिया समोर येत आहेत. यामध्ये निलेश लंके यांच्या आईने मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझा मुलगा रात्रंदिवस प्रचार करत होता. नंतर कळालं पुढचा माणूस (उमेदवार) काहीही करू शकतो. त्यामुळे थोडीशी धाकधुक वाढली होती, असे निलेश लंकेच्या आईंनी म्हटले आहे. (nilesh lanke reaction on lok sabha result ahmednagar lok sabha election 2024 nilesh lanke won sujay vikhe patil) 

ADVERTISEMENT

निलेश लंके यांच्या विजयानंतर टीव्ही 9 मराठीने त्यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया घेतली आहे. यावेळी निलेश लंकेच्या आई म्हणाल्या की, तो सारखा बाहेरच असायचा आणि टेन्शनमध्ये असायचा. आता रात्रंदिवस आपला मुलगा प्रचाक करतो म्हणजे दु:ख सुख काहीच नव्हतं. पण नंतर माहित पडलं पुढचा माणूस (उमेदवार) काहीही करू शकतो. मतदानाला मतजोणीला करू शकतो. त्यामुळे धाकधुक वाढली होती, असे निलेश लंके याच्या आईने म्हटले आहे. तसेच आम्हाला माहितीचं होतं 100 टक्के आपलं होणारच आहे.कारण आपल्याला आपल्या कामाची फळे आहेत, असे लंकेच्या आईंनी सांगितले. 

हे ही वाचा : Maharashtra Lok Sabha : भाजपचे बालेकिल्ले ढासळले! मराठवाड्यात प्रचंड हादरे

'माझ्या लेकाचा अपघात व्हावा म्हणून काही जणांनी दोन-तीन लाखांच्या पूजाही मांडल्या होत्या. त्यामुळे मी घाबरले होते.परंतु, पूजा मांडून कोणी मरत नाही, असं माझा मुलगा म्हणाला. पण काहीजणांनी माझ्या मुलाचा अपघात व्हावा, तो गाडीखाली यावा म्हणून दोन-तीन लाखांच्या पूजा घातल्या होता', असा खळबळजनक आरोप लंकेंच्या आईने यावेळी केला.

हे वाचलं का?

आमदारकीचा राजीनामा देणार त्यात चार महिन्यांची आयुष्यभराची पेन्शन जात होती. दु:खही वाटतं होतं.पण पवारसाहेबांना शब्द पाळण क्रमप्राप्त होतं. त्यात कार्यकर्यांची इच्छा होती, असे निलेश लंकेच्या वडिलांनी सांगितले. पण कार्यकर्त्यांवर खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे, त्यांना संपवायचं या उद्देशाने ही मंडळी पावित्र्यात होती. तसेच आमचा कार्यकर्ता कुठे दिसला की त्याला बरोबर गाठून खच्चीकरण करायचं, त्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांना संपवायचा होता आणि हा एकटा कसा राहतो हे पाहायचं होतं, असे लंकेच्या वडिलांनी सांगितले. या दडपशाही आणि हकुमशाहीमुळे, ही हुकूमशाही संपली पाहिजे

पवार साहेबांचं एक वाक्य आहे, नगर जर भयमुक्त करायचं असेल तर तुझी गरज आहे मला. ते शब्द मला आठवतात. तुम्ही नाशिक, सोलापूर, पुणे पाहा आणि आपलं नगर पाहा. आपलं नगर का मागे आहे? पण नगर भयमुक्त झालं पाहिजे, हुकुमशाही संपली पाहिजे, या उद्देशाने त्याने निवडणूल लढवली, असे निलेश लंकेंच्या वडिलांनी सांगितले.  

ADVERTISEMENT

हे ही वाचा : दिग्गजांना लोळवलं, महाराष्ट्रात 'हे' उमेदवार ठरले 'जायंट किलर'!

दरम्यान अहमदनगर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी पराभव केला. सुजय विखे पाटील यांना 5 लाख 59 हजार 868 मतं पडली तर निलेश लंके यांना 6 लाख 24 हजार 797 मते पडली होती. त्यामुळे लंके यांनी 28 हजार 92 मतांनी विखेंचा पराभव केला.निलेश लंके यांच्या या विजयाचं आता सर्वदुर कौतुक होतं आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT