Chhagan Bhujbal : "छगन भुजबळांना आवरलं पाहिजे", राणे संतापले, महायुतीत ठिणगी!

मुंबई तक

Chhagan Bhujbal Nilesh Rane : भाजपचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे छगन भुजबळ यांच्या विधानावर काय म्हणाले?

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि माजी खासदार तथा भाजपचे नेते निलेश राणे.
छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानामुळे भाजपमध्ये नाराजी.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

छगन भुजबळांच्या विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा?

point

निलेश राणे यांनी व्यक्त केला संताप

point

अबकी बार ४०० पार च्या नाऱ्यामुळे महायुतीला फटका

Nilesh Rana on Chhagan Bhujbal : "400 पार’च्या घोषणेमुळे महायुतीचे नुकसान झाले", या छगन भुजबळ यांच्या विधानामुळे महायुतीतच ठिणगी पडली आहे. भुजबळांच्या विधानावर भाजपतूनच पहिली प्रतिक्रिया उमटली असून, छगन भुजबळांना आवरले पाहिजे. भुजबळांचं का ऐकून घ्यावं?, असा सवाल करत माजी खासदार निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. (Former MP Nilesh Rane has expressed his anger on the statement made by NCP Leader Chhagan Bhujbal)

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्याआधीच महायुतीमध्ये छगन भुजबळ यांच्या विधानाने वाद निर्माण झाला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईतील गरवारे क्लबला बैठक झाली. या बैठकीत छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानाने नवीन चर्चेला तोंड फुटले आहे. भुजबळ यांच्या विधानावर माजी खासदार निलेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >> भाजप-काँग्रेस किती जागा जिंकणार? 'या' निवडणूक विश्लेषकाने सांगितला फायनल आकडा! 

निलेश राणे भुजबळांच्या विधानावर काय म्हणाले? 

भुजबळांच्या विधानाबद्दलची बातमी पोस्ट करत निलेश राणे म्हणाले, 

"मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं??? मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही, नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही. आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही. आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठ सूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे", असे निलेश राणे म्हणाले आहेत.

छगन भुजबळ ४०० पार बद्दलचं नेमकं विधान काय?

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंसमोरच भुजबळ म्हणाले की, "भाजपने 400 पार चा नारा दिला. त्यामुळे दलित समाजात संविधान बदलणार, हे बिंबवलं गेलं. ते त्यांच्या मनातून काढण्यासाठी नाकी नऊ आले. पंतप्रधान मोदींनाही मुलाखतीतून वारंवार संविधान बदलणार नाही हे सांगावं लागतंय."

हेही वाचा >> 'उद्धव ठाकरे, शरद पवारांबद्दल महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट', भुजबळांचे मोठे विधान 

छगन भुजबळ यांच्या या भूमिकेमुळे महायुतीच्या काही मुद्द्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी भूमिका असल्याचे समोर आले आहे. त्याचीच आता राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp